कळमोडी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरु

Kalwande Dam
Kalwande Dam

चास : खेड तालुक्यासह आंबेगाव तालुक्यासाठी वरदान ठरणारे कलमोडी धरण आज (गुरुवारी) पहाटे फुल्ल झाले असून, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

1.54 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाला दरवाजे नसून, धरण ओव्हरफ्लो होताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. कलमोडी धरण भरल्याने या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा चासकमान धरणात येत असल्याने चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com