Video : इंदापुरच्या शेतात कोसळलं बारामतीचं विमान; महिला पायलट जखमी

बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते.
Karwar Aviation
Karwar Aviation Sakal

इंदापूर : विमानातील इंधन संपल्याने इंदापूर येथील एका शेतामध्ये एक विमान कोसळून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात विमानातील एक वैमानिक जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल शेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. भाविका राहुल राठोड असे जखमी झालेल्या वैमानिकेचे नाव आहे.

Karwar Aviation
जवाब दो! खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, अचानक या विमानातील इंधन संपले आणि ते इंदपूर तालुक्यातील कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

Karwar Aviation
आरे रस्ता तात्पुरता बंद! मेट्रोच्या कामासाठी पुन्हा झाडतोड होत असल्याची तक्रार

ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती येथील कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com