Pune News : काटेवाडीकरांकडून गोपीचंद पडळकर यांच्या फोटोवर जोडे मारत निषेध

अजित पवार यांच्या काटेवाडी या गावी वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत निषेध
Katewadi residents protest against Gopichand Padalkar ajit pawar pune politics ncp
Katewadi residents protest against Gopichand Padalkar ajit pawar pune politics ncpSakal

काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावी वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत निषेध केला. यावेळी येथून पुढे पडळकर यांनी असेच बेताल वक्तव्य सुरू ठेवले तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमकपणे या विरोधात रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील देण्यात आला.

दोन दिवसापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद काटेवाडी येथे बुधवारी ( ता. २० ) उमटले. यावेळी बोलताना सरपंच विद्याधर काटे म्हणाले, ज्या माणसाचे बारामती मध्ये डिपॉझिट जप्त झाले.

ज्या माणसाला स्वतःची लायकी माहित नाही तो माणूस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करत आहे. काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तर शितल काटे म्हणाले, गोपीचंद पडळकर यांचे एक तरी चांगले काम दाखवा. महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची संस्कृती आहे.

Katewadi residents protest against Gopichand Padalkar ajit pawar pune politics ncp
Pune News : कमवा व शिका योजनेच्या मानधनवाढीच्या प्रस्तावावर सहा महिन्यानंतरही अंमलबजावणी नाही; अधिसभा सदस्यांचा रोष

ज्यांचा संस्काराची संबंध नाही अशी माणसे या संस्कृतीला डाग लावण्याचे काम करीत आहेत. गोपीचंद पडळकर आणि सुसंस्कृतपणा याचा कुठेही संबंध नाही. विधान भवनामध्ये सुद्धा पडळकर अरेरावीची भाषा वापरून तेथील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील सातत्याने टीका करतात.

त्यामुळे पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. यावेळी प्रकाश टेंगले, के.टी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोवर जोडे मारत निषेध केला.

Katewadi residents protest against Gopichand Padalkar ajit pawar pune politics ncp
Pune News : कराराला ठेंगा पण जागा शोधण्यासाठी ठेकेदाराला अधिकारी घालताहेत पायघड्या

तसेच पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अनिल काटे, श्रीधर घुले, अमोल काटे, संजय शेळके, संजय पिंगळे, धनंजय काळे, धीरज घुले, मिलिंद काटे, सागर भिसे, अजित काटे, संजय देवकते, दिलीप काटे,

रणजित गायकवाड, निखिल काटे, रोहित काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com