काळाच्या बदलत्या प्रवाहात चालत राहा - अच्युत गोडबोले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

‘काळ वेगाने बदलत आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहात चालत राहिलो, तरच आपले अस्तित्व राहू शकेल. कारण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात कित्येक वर्षे दूर असलेले शोध आज वर्तमानात प्रत्यक्षात दिसू लागले आहेत,’’ असे प्रतिपादन आयटीतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.

पिंपरी - ‘काळ वेगाने बदलत आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहात चालत राहिलो, तरच आपले अस्तित्व राहू शकेल. कारण, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भविष्यात कित्येक वर्षे दूर असलेले शोध आज वर्तमानात प्रत्यक्षात दिसू लागले आहेत,’’ असे प्रतिपादन आयटीतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ताथवडे शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सकाळ यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (यिन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनोव्हिजन २०२०’ या सामाजिक व तंत्रज्ञान उपक्रमात ते बोलत होते. या वेळी सकाळ कम्युनिटी नेटवर्कचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, जेएसपीएमचे संचालक डॉ. रवी जोशी, संचालक अनिल भोसले, कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संकुलप्रमुख रवी सावंत, उपप्राचार्य प्रा. ए. एस. देवस्थळी, इनोव्हिजनचे संयोजक डॉ. अजय पैठणे, डॉ. ज्ञानेश्‍वर मते, प्रा. रवी बोर्डे उपस्थित होते.

चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

गोडबोले म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुखता निर्माण व्हावी. तंत्रशिक्षणाचा उपयोग सामाजिक समस्या निर्मूलनासाठी होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी सांघिक कामगिरी करणे आवश्‍यक आहे. यापुढे जे शोध लागतील ते सांघिक कामगिरीवर आधारित असतील. त्यामुळेच जगातील विविध देश, संस्था, क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश संशोधन, औषधनिर्माण शास्त्र इत्यादी क्षेत्रात एकत्र येत आहेत. पण, हे शोध लावताना आपण तत्त्वांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. कारण, तंत्रज्ञान रोजच बदलत असते.’’

चऱ्होली ते विमानतळ रस्त्यासाठी ३६ कोटी

गुजराथी म्हणाले, ‘‘आज विद्यार्थी नावीन्यपूर्ण शोध लावत आहेत. परंतु, प्रत्यक्षात किती शोध मार्केटमध्ये विकले जात आहेत, त्याचा उपयोग होत आहे, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. सध्या इनोव्हेशनमध्ये चीन देश सर्वांत पुढे आहे. साचेबद्ध विचारसरणी बदला, चौकटीतून बाहेर पडा, तरच बदल दिसेल.’’ तपन पाटील, कपिल चौधरी, नेहा बेंडाळे आणि रेणुका पारेकर यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep up with the changing times of the world achyut godbole