Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

Siya Goyal : साखरपुडा मोडल्यास बदनामी होईल या भीतीने सियाने केतनला संपवण्याची योजना आखल्याचे समोर आले. सियाने केतनचा पासपोर्ट चोरून नष्ट केला, ज्यामुळे बाली ट्रिप रद्द झाली. घटनाक्रम समजण्यासाठी पोलिसांनी ३०० फूट दरीत डमी फेकून प्रयोग केला आहे.
Ketan Agrawal murder case,

Ketan Agrawal murder case

esakal

Updated on

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली.लोहगडावरुन केतनला नेमके कोणी ढकलले, याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिची 'लाय-डिटेक्टर'चाचणी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com