esakal | खडकवासल्यातील जूनमधील यंदाचा पाऊस अकराव्या स्थानावर
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala Dam

खडकवासल्यातील जूनमधील यंदाचा पाऊस अकराव्या स्थानावर

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) या वर्षी जून महिन्यात २०९ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. मागील २६ वर्षांत जून महिन्यात जास्त पाऊस पडल्याच्या क्रमवारीत यंदा पडलेला पाऊस अकराव्या स्थानावर आहे. (Khadakwasala Rain June Eleventh Ranking)

दरवर्षी राज्यात मॉन्सूनचे आगमन ७ जून रोजी होत असते. अरबी समुद्रातील वाऱ्याच्या परिस्थितीमुळे पाऊस येण्याची वेळ पुढे मागे होते. पण पाटबंधारे विभागाकडे मात्र एक जून पासून पाऊस पडल्याची नोंद करीत असते. म्हणजे पावसाचे नवीन वर्ष एक जून रोजी सुरु होऊन ३१ मे रोजी संपते होते. जूनच्या ३० दिवसांत किती पडतो. मागील २६ वर्षांत म्हणजे १९९६ पासून यावर्षी २०२१ पर्यंत पाऊस पडलेल्या नोंदी खडकवासला पाटबंधारे विभागाकडे आहेत. त्यानुसार, खडकवासला धरण येथे १९९६ मध्ये जून महिन्यात ३१९ मिलिमीटर पाऊस पडला होता. हा मागील २६ वर्षातील सर्वांत जास्त पाऊस पडला आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने २००५ मध्ये ३१३ तर २०१५ मध्ये २९१ मिलिमीटर पाऊस पडला होता. तसेच, जून महिन्यात सर्वात कमी पाऊस २००९ मध्ये फक्त २४ मिलिमीटर पडला होता. अशा प्रकारे २०१४ मध्ये २५, तर २०१२ मध्ये ३२ मिलिमीटर पाऊस पडला होता.

हेही वाचा: सुप्रिया सुळेंच्या ट्विटमुळं गावकऱ्यांना काही तासांत मिळाला दिलासा!

खडकवासल्यात पावसाची सरासरी ७०५ मिलिमीटर आहे. यंदा जून महिनाअखेर २०९ मिलिमीटर म्हणजे २९.६४ टक्के पाऊस झालेला आहे. पानशेत धरणात दरवर्षी सरासरी दोन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. ३० जून अखेर ३७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या १८.९टक्के झाला आहे. वरसगाव धरणात दरवर्षी दोन हजार १०० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडत असतो. यंदा ३६६ मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या १७.४२ टक्के आहे. टेमघर येथे सरासरी तीन हजार ४३० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ५५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या १६.१८ टक्के पाऊस झालेला आहे.

loading image