घराला बाहेरून कडी लावून गेली होती 'ती'; खडकवासला धरणात आढळला मृतदेह

पती, मुलगा व मुलगी झोपलेले असताना अनुराधा या सकाळी लवकर उठून घराबाहेर पडल्या होत्या.
Death
DeathSakal

किरकटवाडी : घरातील सर्व झोपेत असताना सकाळी लवकर उठून घराला बाहेरून कडी लावून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह खडकवासला धरणात पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. अनुराधा अनिल गोरे (वय 42, रा. देशमुख वाडी, न्यु कोपरे, ता. हवेली जि.पुणे) असे सदर महिलेचे नाव असून घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती हवेली पोलीसांनी दिली आहे. (Khadakwasla Women Death in Khadakwasla Dam)

पती, मुलगा व मुलगी झोपलेले असताना अनुराधा या सकाळी लवकर उठून घराबाहेर पडल्या होत्या. जाताना त्यांनी घराला बाहेरून कडी लावली होती. पती अनिल गोरे हे उठल्यानंतर त्यांना अनुराधा दिसल्या नाहीत. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाहेरून बंद होता. त्यांनी शेजाऱ्यांना फोन करुन दरवाजा उघडण्यास सांगितले. आजुबाजुला शोध घेतला पण अनुराधा आढळून आल्या नाहीत.

Death
ज्येष्ठ विधीतज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास चालण्यासाठी खडकवासला धरण परिसरात गेलेल्या स्थानिकांना एका महिलेचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तात्काळ ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला देण्यात आली. हवेली पोलीसांनी पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणात पंप हाऊस जवळ असलेला मृतदेह बाहेर काढला व जवळच्या पोलीस ठाण्यांना फोटो पाठवले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला.

बराच वेळ झाला तरी पत्नी घरी न परतल्याने अनिल गोरे हे तक्रार दाखल करण्यासाठी उत्तम नगर पोलीस ठाण्यात गेले असता तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी हवेली पोलीसांनी पाठविलेला फोटो दाखवला. तो फोटो गोरे यांनी ओळखला व तातडीने हवेली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनिल गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जालिंदर गायकवाड याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com