खेडचे माजी आमदार गोरे यांचे कोरोनामुळे निधन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. 55 वर्षीय गोरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. 

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्याचे माजी आमदार  आणि राजकारणातील सुसंस्कृत संयमी आणि मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले सुरेश गोरे यांचे आज ( १० ऑक्टोबर ) सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान पुणे येथे रुबी रुग्णालयात निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांना २१ दिवसांपूर्वी कोरोनाने गाठले होते. खेड तालुक्यातील शिवसेनेचे ते पहिले आमदार होते. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्याला आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला असून सर्व तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, तब्बल ७ भाऊ, चुलते, चुलतभाऊ असा ४५ माणसांचा एकत्र परिवार आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोरे यांना एकवीस दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आधी चाकण व नंतर पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी उपचाराला त्यांनी प्रतिसादही दिला. मात्र गेली तीन चार दिवस त्यांची फुफ्फुसे काम करीत नव्हती. त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि अखेर आज सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

सुरेश गोरे २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांना 33 हजार मतांनी हरवून शिवसेनेचे खेड तालुक्याचे पहिले आमदार झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मात्र ते मोहिते यांच्याकडून पराभूत झाले. तत्पूर्वी तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाले होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना अडीच वर्षे मिळाला होता.  

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khed former mla suresh gore passes away