Loksabha Election : खेड तालुक्याला लाल दिवा कधी मिळणार कधी स्वप्न पूर्ण होणार ?

दिलीप मोहिते जेव्हा मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री असेल " असा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किल टोला ऐकून पदाधिकारी, कार्यकर्ते ही खुश झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

चाकण: दिलीप मोहिते जेव्हा मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री असेल " असा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किल टोला ऐकून पदाधिकारी, कार्यकर्ते ही खुश झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.खेड तालुक्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार? गेली पंधरा वर्षे मंत्री पदाची आस लावून असलेले आमदार दिलीप मोहिते कधी मंत्री होणार हा सवाल मात्र पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आहे. माजी आमदार स्व.नारायणराव पवारां पासून लाल दिव्याचे स्वप्न बाळगून असलेला खेड तालुका लाल दिव्याचे स्वप्न कधी पूर्ण करणार हे मात्र अनुत्तरित आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या बारामतीसह वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.काल खेडच्या दौऱ्यावर असताना आमदार दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मागणीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांना मिश्किल टोला लगावला. त्या टोल्याने खेड तालुक्यात मात्र चर्चेला उधाण आले आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका केल्या . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खेड, आंबेगाव, जुन्नर,शिरूर,भोसरी या तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.खेडचे आमदार दिलीप मोहिते यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत एक मिश्किल टोला लगावत मोहीते पाटील यांना कोपरखळी मारली.

अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आमदार मोहिते यांच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तसेच आमदार मोहिते मंत्री झाले पाहिजेत अशी मागणी केली. कार्यकर्त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केले होते . त्यांचे हे विधान खेड तालुक्यात चांगलेच चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार आहे.

राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी अधिक लक्ष घातले आहे .

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करून त्यांना आव्हान दिले होते. खासदाराने मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता शिरूरमधून उमेदवार निवडून आणणारच”, असे अजित पवार याआधी म्हणाले होते. आता अजित पवार हे स्वत: स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. एक,दोन दिवसात माझी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे हे मात्र निश्चित आहे.त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Loksabha Election
Pune : सोशल मिडियातील भाषेवरून बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे युवक आमनेसामने

माजी खासदार आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तर मी प्रचार करणार असे आमदार दिलीप मोहिते यांनी जाहीर केल्यामुळे त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन मिळत आहे असेही वास्तव आहे. महायुतीमध्ये आढळराव हे उमेदवार असल्यामुळे महायुती मधील इतर पक्ष काय भूमिका घेतात हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले,की "महायुती जो उमेदवार ठरविल त्या उमेदवाराचे भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करतील." सध्या भाजपचे काही पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते नेमके काय भूमिका घेतील यावरही बरेच काही चित्र अवलंबून आहे.

खेडला हवाय लाल दिवा....

यापूर्वी गेली वीस वर्षे खेड तालुक्याचे आमदार म्हणून स्व. नारायण पवारांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांना लाल दिवा मिळाला नाही.त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. ते अपक्ष म्हणूनही निवडणुकीस उभे होते. त्यांचा त्यावेळी पराभव झाला आणि आमदार दिलीप मोहिते निवडून आले. लाल दिवा मिळाला नाही म्हणून स्व. माजी आमदार नारायण पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनाही लाल दिवा पाहिजे अशी कार्यकर्त्यांची व त्यांची भूमिका आहे. परंतु 2024 च्या निवडणुकित आमदार दिलीप मोहिते खेड तालुक्यात विजयी होतील असे त्यांच्या समर्थक पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळी तरी मंत्री पद द्यावे अशी जोरदार मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com