रस्त्यावर पडलेली फळे तो लाथेने उडवत, जोरजोरात ओरडत, रडत आक्रोश करत होता; तो एवढा बेफाम का झाला

कोथरुड - रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली फळे
कोथरुड - रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली फळे

कोथरुड - गांधी भवन लगतच्या गल्लीत रस्त्त्यावर पडलेली फळे तो लाथेने उडवत होता. जोरजोरात ओरडत, रडत आक्रोश करत होता. त्याचे रडणे, ओरडणे पाहून रस्त्याने येणा-या जाणा-यांना काय झाले ते समजत नव्हते. सरकारी नियमानुसार संध्याकाळी सातनंतर जे भाजी, फळे विक्री करत होते त्यांच्यावर अतिक्रमण विभागाची कारवाई रोज करण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्यावरुन घरी निघालेल्या त्या फळविक्रेत्यावर महापालिकेच्या विभागाने कारवाई करण्यासाठी त्याच्या गाडीतील साहित्य उचलायला सुरुवात केल्याने त्या तरुणाचा संताप अनावर झाला. कारवाईला विरोध करत त्याने आरडाओरडा सुरू केला. जोरात आक्रोश करत, डोके आपटून घेत त्याने स्वतःला दुखापत करुन घेतली.

काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार या तरुणाची हातगाडी अतिक्रमण विभागाच्या लोकांनी उलटी केल्यामुळे तो बेभान झाला. मात्र महापालिकेच्या अधिका-यांनी तो तरुण गांजा पिला होता. त्याने स्वतःच फळे रस्त्यावर फेकली असे सांगितले.  हा विक्रेता ऐवढा बेभान का झाला, नागरिकांना या संकटाच्या काळात निराधार का वाटते आहे. याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत परिसरातील लोकांनी मांडले. सतिश रोंघे यांनी या युवकाचे सांत्वन करत त्याला कोथरुड क्षेत्रिय कार्यालया जवळ स्वतःच्या गाडीतून नेवून सोडले व मदत म्हणून पाचशे रुपये दिले.

कोथरुडमधील काही भागात फळ, भाजी विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात दादागीरी आहे. त्यासाठी ते स्थानिक रहीवाशांना दमदाटी करायलाही मागेपुढे पहात नाही. त्यांच्या या दादागीरीला आवर घाला अशा बहुसंख्य तक्रारी महानगरपालिकेकडे आहेत. परंतु त्यांना शिस्त लावण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. जेव्हा महानगरपालिका कडक कारवाई करायला जाते तेव्हा वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करुन अतिक्रमण करणारे कारवाई रोखतात त्यातलाच हा प्रकार होता असे महानगरपालिकेच्या कामगारांनी सांगितले.

सतिश रोंघे, (व्यावसायिक व प्रत्यक्षदर्शी)- सध्याच्या वाईट परिस्थितीत प्रत्येक जण जगण्याचा संघर्ष करत आहे. अशावेळी कारवाई करताना माणुसकी विसरु नये. नियमा प्रमाणे अवश्य कारवाई व्हावी. परंतु घरी चाललेल्या फळ विक्रेत्यावर ज्या पध्दतीने कारवाई झाली. त्याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम- महापालिकेचे कामगार नियमा प्रमाणे काम करत आहेत. ते कधीही रस्त्यावर सामान फेकून देणार नाही. फळविक्रेत्याने नशेमध्ये हा प्रकार केला. बरेचदा कारवाई करु नये म्हणून अतिक्रमण करणारे लोक स्वतःचे कपडे फाडणे आदी प्रकार करतात. लोकांनी स्वतः शिस्त पाळायला हवी. परंतु ते पाळत नसतील व प्रशासन त्यांना शिस्त लावत असतील तर सहकार्य करावे. कांगावा करणा-यांना रोखायला हवे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com