
लोणी काळभोर(पुणे): चुलत भावासोबत त्याच्या दूचाकीवरून, पुरंदर तालुक्यातील मूळगावी निघालेल्या तरूणीचे दिवे घाटात तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. या काल (ता. ३) सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या मारहाणीत तरूणीचा भाऊ देखील जखमी झाला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत तरूणाने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिल्यानंतर लोणीकाळभोर पोलिसांनी अनिस पठाण याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या गंभीर घटनेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरूद्ध यापूर्वी, संबंधित तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अपहरण झालेल्या १९ वर्षीय तरूणीची सीईटीची परीक्षा असल्याने ती भावासोबत पुण्यात आली होती. परीक्षेनंतर ती मूळगावी निघाली असता, पाऊस येत असल्याने पूर्वी राहात असलेल्या हडपसर परिसरातील घरी मुक्कामी थांबली. त्यानंतर काल (ता. ३) सकाळी सात वाजता भावाच्या दूचाकीवरून मूळगावी निघाली असता, दिवे घाटात मागून येणाऱ्या लाल रंगाच्या स्वीफ्ट (क्र. एमएच १२ सीवाय ७०५६) मोटारीने त्यांच्या दूचाकीला मोटार आडवी घालून थांबण्यास भाग पाडले. त्याचवेळी अनिस पठाण हा आणखी एका साथीदारासह पल्सर दूचाकीवरून (क्र. एमएच १२ क्यूएस ८१०८) घटनास्थळी आला. संबंधित तरूणीला तो खेचू लागताच तिच्या भावाने प्रतिकार केला असता, अनिस याने शर्टच्या मागील बाजूस लपवलेला कोयता काढून त्याच्या हातापायावर उलट्या बाजूने मारला. तरीही संबंधित तरूणाने प्रतिकार केला असता, अनिस याच्यासह त्याचा साथीदार व स्वीफ्ट चालकाने त्याला मारहाण केली. त्यानंतर अनिस पठाणने संबंधित तरूणीला त्याच्या दूचाकीवरून बळजबरीने हडपसरच्या दिशने पळवून नेले.
तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा
या प्रकारानंतर जखमी अवस्थेतील तरूणाने उरूळी देवाची पोलिस चौकीत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ दाखल करून पठाणसह तिघांविरूद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
संबंधित तरूणीवर वर्षभरापूर्वी पठाण याने बलात्कार केला होता व त्याबाबत तीच्या फिर्यादीवरून पठाण याच्या विरुद्ध हडपसर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. याच कारणावरून, १४ सप्टेंबरला पठाण व त्यांच्या मित्रांनी संबंधित तरूणीला व तीच्या कुटूंबियांना मूळ गावी जाऊन मारहाण केल्याने त्यांच्याविरूद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळेच संबंधित तरूणीचा भाऊ पठाण यास ओळखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.