Pune News : भिक्षेकरी महिलेच्या 2 लाखासाठी अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्याची बिहार मधून सुटका

नक्सली भागात उल्हासनगर पोलिसांची कामगिरी
Pune News
Pune Newsesakal

उल्हासनगर : भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या भिक्षेकरी महिलेच्या 2 लाख रूपयांसाठी अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्याची उल्हासनगर पोलिसांनी नक्सली भागातील बिहारमधून सुटका केली आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता भोईघर यांच्या टीमने केली आहे.

Pune News
Nashik News : नाशिक ते माळेगाव एमआयडीसी दरम्यान बस सेवा सुरु

मीना सोनवणे या महिलेचा पती मिळेल ते हातमजुरीचे काम करतो.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मीना ही झुलेलाल मंदिराच्या बाहेर बसुन भिक मागून उदरनिर्वाह चालवते.मिनाचा सर्वात लहान मुलगा कार्तिक हा पाच महिन्याचा मुलगा असून त्यांच्या गंभीर आजाराचे निदान फेब्रुवारी महिन्यात झाले होते.तिने कार्तिक व मध्यवर्ती हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डचा फोटो सोशल मिडीयाचे व्हाट्सपवर अपलोड करून त्याच्या औषधोपचाराकरीता अर्थिक मदत मिळण्यासाठी आवाहन केले होते.

Pune News
Jalgaon Crime News : ग्रामस्थांनी अडविलेले अवैध गोवंश वाहतुकीचे वाहन घेउन चालक फरार

काही दिवसानंतर बोरिवली मध्ये राहणारी स्वाती सहदेव बेहरा हिने हैदराबाद येथे कार्तिकचा उपचार होणार असल्याचे सांगून 12 फेब्रुवारीला मीना,तिचा पती आणि आजारी मुलगा कार्तिकला हैद्राबाद येथे नेले.तिथे गेल्यावर स्वाती बेहरा हिने सोनीदेवी पासवान हिची भेट घडवून आणली.सोनीदेवीने कार्तिकच्या उपचाराचे दोन लाख रुपये मी पहिलेच डॉक्टरकडे भरले असल्याचे सांगून मीना आणि तिच्या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था एका लॉजवर केली होती.

Pune News
MSEB News : 24 तास ‘ऊर्जा चॅट बॉट’ ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध

दुसऱ्याच दिवशी स्वाती बेहरा आणि तिची एक मैत्रीण लॉजवर आले.डॉक्टरची वेळ घेतल्याचे सांगून कार्तिकला सोबत घेऊन गेले.एक दिवस झाल्यावर कार्तिकला परत न आणल्याबाबत मिनाने विचारणा केली असता कमीत कमी एक महिना कार्तिकवर उपचार चालणार आहे.उपचाराचा सर्व खर्च हा सोनीदेवी उचलत असल्याचे सांगितल्यावर त्यावर विश्वास ठेवत आणि घरी चार लहान मुले व वयस्कर सासू असल्याने मीना आणि तिचा पती हे घरी परतले.मिना ही नियमित सोनीदेवी व स्वाती बेहरा यांच्याबरोबर फोनवरून संपर्कात राहुन कार्तिक याचे तब्येतीची विचारपुस करीत होती.

Pune News
Jalgaon Political News : गुलदस्त्यातील राजकीय भूमिका सुरेशदादा जैनांनी केली जाहीर

व्हिडीओ फोन करून त्यास बघुन पाठपुरावा करत होती.त्यानंतर एक महीना पुर्ण झाल्यानंतर मिनाने सोनीदेवी व स्वाती बेहरा यांना फोन करून आमचा मुलगा कार्तिकवरील औषधोपचार पुर्ण झाले असेल तर त्यास आमचेकडे परत आणुन द्या,आम्ही तिकडे त्यास घेण्यासाठी येतो अशी म्हटल्यावर असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले.मुलगा कार्तिक याला परत करण्यास टाळाटाळ केली.सोनीदेवी हिने नंतर थेट दवा उपचारासाठी दिलेले दोन लाख रुपये द्या मग कार्तिक देतो असे सांगत कार्तिक यास परत करण्यास नकार दिला.

Pune News
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

मिनाला कार्तिकचे अपहरण केल्याची खात्री पटल्यावर तिने 1 मे रोजी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठत दोघींविरोधात गुन्हा दाखल केला होता.पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे,पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादला गेलेल्या पोलीस पथकाने सोनीदेवीला ताब्यात घेतले.तिने कार्तिक हा बिहार मध्ये असल्याचे सांगितल्यावर 7 मे रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता भोईघर,हवालदार संजय सोळंके,शेळके,अनिल,महिला पोलीस अंबात, दौड हे बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील भाकरपूर या गावाकडे रवाना झाले.

हा नक्सली भाग असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मालादेवी राजक या महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली.तसेच अपहरण झालेल्या बाळाला सुखरुप ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.या घटनेतील आणखीन काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com