बिल्डरकडून खंडणीसाठी ऑफिस बॉयलाच केलं किडनॅप; पुण्यात दोघांना अटक

Crime_Kidnapping
Crime_Kidnapping
Updated on

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या ऑफीस बॉयचे अपहरण करुन बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडण विरोधी पथकाने दोघांना अटक केली. 

आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय 29 ) आणि राहूल बाळू घोरपडे (वय 22, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे येथील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे एक तरुण ऑफीस बॉय म्हणून काम करतो.

बुधवारी सकाळी संबंधीत तरुण शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्‍लेव्ह येथून जात होता. त्यावेळी आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यास रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. आरोपींनी फिर्यादी साईकुमार यांना फोन करून त्यांच्या कर्मचाऱ्याला सोडून देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिसांना खबर दिली. 

दरम्यान, अपहरणकर्त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यावरुन वाद झाले. आरोपी एकमेकांशी भांडू लागल्याची संधी साधून तरुणाने तेथून पलायन करीत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपींच्या मागावर असलेल्या खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com