Work_From_Home
Work_From_Home

'वर्क फ्रॉम होम'चा आयटीयन्सच्या परफॉर्मन्सवर 'असाही' होतोय परिणाम!

पुणे : कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्या आयटी क्षेत्रातील नोकरदारांना घरूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय चांगला असला तरी घरून काम करताना कर्मचाऱ्यांच्या उत्पादकता आणि कामगिरीवरही विपरीत परिणाम झाला आहे. घरून काम करणाऱ्या आयटीतील 30 टक्के कर्मचाऱ्यांनी कामगिरी घसरली असल्याचे 'नाइट फ्रॅंक इंडिया'ने केलेल्या सर्व्हेत मान्य केले आहे.

सर्वेक्षणात पुणे, मुंबई, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद या शहरांमधील एक हजार 600 आयटी कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. वर्क फ्रॉम होमबाबत त्यांचे मत या सर्व्हेत समजून घेण्यात आले. कार्यालयीन प्रवास नसल्यामुळे वेळ वाचला असल्याचे 60 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर प्रवास खर्च नसल्याने पैशांची बचत होत असल्याचे 58 टक्के कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे. कार्यालयीन कामकाजाची कमतरता जाणवत असल्याचे 43 टक्के कर्मचारी सांगतात. या अहवालानुसार, देशातील आयटी उद्योग आपल्या कामकाज उत्पन्नाच्या अंदाजे 4.3 टक्के रिअल इस्टेटवर खर्च करते. छोट्या आयटी कंपन्यांचा रिअल इस्टेटवर 4.7, तर मोठ्या आयटी कंपन्या 4.4 टक्के खर्च करतात, तर मध्यम कंपन्यांचे प्रमाण 3.6 टक्के आहे.

सध्या कर्मचारी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत. सर्व सुरळीत झाल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची गरज अनेक घटकांद्वारे निश्‍चित केली जाईल. कंपन्यांच्या कामकाज खर्चाची सध्या काहीशी बचत होत आहे. मात्र त्याच वेळी गुणात्मक बाबींवर नियंत्रण नसणे, स्पर्धात्मक नीती आणि डेटा सुरक्षा याचा देखील विचार व्हायला हवा.
- शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रॅंक इंडिया

90 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसची आठवण :
घरून आणि ऑफिसमध्ये काम करण्यात आलेला फरक आता कर्मचाऱ्यांना जाणवायला लागला आहे. त्यामुळे 90 टक्के आयटी कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातील वातावरणाची आठवण होऊ लागली आहे. सुरक्षेचा विचार करून ऑफिसला जाऊन काम करण्यास काहींनी प्राधान्य दिले आहे, असे हा अहवाल सांगतो.

ऑफिसमधील कार्यालयाची आठवण काढणारे कर्मचारी (टक्केवारी) :
कधीतरी - 51
कायम - 21
अनेकदा - 18
कधीच नाही - 10

काय म्हणतात आयटी कर्मचारी :
- उत्पादकता आणि कामगिरीवरही विपरीत परिणाम झाला.
- घरून कामामुळे वेळ आणि पैशांची बचत
- कार्यालयीन कामकाजाची आठवण येतेय.
- सुरक्षेचा विचारू करून ऑफिसमध्ये काम करता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com