esakal | Pune : चुकीच्या नियोजनाने एनआयबीएम रस्त्याची चाळण
sakal

बोलून बातमी शोधा

kondhwara road

Pune : चुकीच्या नियोजनाने एनआयबीएम रस्त्याची चाळण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यांवरील क्लोवर हिल्स प्लाझाजवळ प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर, अरुंद रस्त्यांमुळे अपघात आणि वाहतूकोंडीला निमंत्रण मिळत आहे.

हेही वाचा: Maharashtra Temples Reopen : संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन सुरु

महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी पाण्याची लाईन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली. मात्र, पाण्याची लाईन टाकल्यानंतर ठेकेदारांकडून रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, या नियमाला पालिका प्रशासन आणि ठेकेदारांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. सध्या पाण्याच्या लाईनसाठी खोदण्यात आलेल्या अर्ध्या रस्त्यांवरून वाहनचालकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे तो रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने उर्वरित रस्ता अरुंद बनला आहे. त्यातच चांगल्या रस्त्यावरही काम करताना राडारोडा उडून आला आहे. तसेच बारीक खडीही पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीचालक तर घसरून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

हेही वाचा: भारताचा जवळचा मित्र रशियाची तालिबानला साथ

पाण्याच्या लाईनसाठी केलेल्या खोदाईनंतर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच, त्या ठिकाणी उतार असल्याने आणि रस्ता निसरडा झाल्याने किरकोळ अपघात होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही होताना दिसते.

"प्रशासनाने पाण्याची लाईन टाकल्यानंतर रस्त्याचे काम व्यवस्थित करणे गरजेचे होते. परंतु, कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आता रस्त्याची दुरवस्था झाली असून अनियोजित कामामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे."

- अनिल बन्सल, स्थानिक नागरिक

loading image
go to top