Koyta Gang : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; गँगमधील मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या

कोयता गँगची दहशत नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करत कोबिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
Koyta Gang
Koyta Gang Sakal

Pune Police Arrest Koyta Gang Accused : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने मोठी दहशत माजवली आहे. वाढत्या दहशतीनंतर पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Koyta Gang
Pune Koyata Gang Video: कोयता गँगच्या सदस्याला चोप चोप चोपलं !

त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Koyta Gang
Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तरुणांना कोयता पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक

तसेच पोलिसांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ४० हून अधिक कोयते जप्त केले आहेत, अशी माहिती पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरक्षः दहशत माजवली होती. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले होते.

Koyta Gang
Pune Koyta Gang: कोयता गँग गुंडाची पोलिसांनी अटक करत काढली धिंड

कोयता गँगची दहशत नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करत कोबिंग ऑपरेशन सुरू केले होते. त्यादरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुधवारी विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.

त्यात विविध भाघातून ४० हून अधिक कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Koyta Gang
Pune Koyta Gang Video : पाच कोयते, आठ जण; थरार सीसीटिव्हीत कैद!

विशेष म्हणजे वरील सर्व आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोयते जप्त केले आहेत, अशी माहिती झेंडे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com