गावी जाण्यासाठी मजूर दाम्पत्याची धडपड; ठेकेदाराने फसवून पुण्याला पाठविले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

- गाव गाठण्यासाठी मजूराची मजल दरमजल
- ठेकेदाराने फसवून पुण्याला पाठविले
- पुसदला जाण्यासाठी धडपड

पुणे : महाबळेश्‍वर येथे मजूरी करणाऱ्या दांपत्याला ठेकेदाराने ''तुम्ही पुण्याला जा, तेथून मोफत बस सुरू झाली आहे'' असे खोटे सांगून पुण्याला पाठविले. तेथे आले तर बस बंद, त्यात कोरोनाची भिती यामुळे हे दांपत्य अस्वस्थ झाले. अखेर एका टेम्पो चालकाला 100 रुपये देऊन शिक्रापूर गाठले आहे. भयावह स्थितीत हे मजूर हिंगोली जिल्ह्यातील पुसदला जाण्यासाठी मजल दरमजल करत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये रहाणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. यात केवळ परप्रांतीय मजूर नाहीत, तर महाराष्ट्रातील गरीब लोक ही आहेत. रोजगार, पैसे, अन्नधान्य काहीच नसल्याने कधी एकदा गावाकडे जातो अशी अवस्था त्यांची झालेली आहे. वाहनाची व्यवस्था नसल्याने शेकडो किलोमिटर पायी जाण्याचे धाडस करत आहेत. अशाच मजूरांपैकी एक आहेत साहेबराव मिरटकर यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला.

आणखी वाचा - महाराष्ट्रात राबवा बारामती पॅटर्न!
महाबळेश्‍वरच्या मंदीराजवळ बांधकाम साईट सुरू आहे. तेथे साहेबराव व त्यांची पत्नी काम करत होती. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते तेथे रहात होते. अखेर तेथील ठेकेदाराने तुम्ही पुण्याला जा सरकारने मोफत बसची व्यवस्था केली आहे असे खोटे सांगितले. काही प्रवास पायी तर कधी वाहनाला हात दाखवून हे दांपत्य दोन दिवसाने पुण्यात शिवाजीनगर बसस्थानक येथे आले. पण ओस पडलेले बस स्थानक बघून दोघेही हवालदिल झाले. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, त्यात पुण्यात असलेला कोरोनाचा उद्रेक यामुळ हे दांपत्य भयभीत झाले. तेथे काही जणांनी तुम्ही लवकर पुणे सोडा, नाही तर तुम्हाला धोका आहे अशी भिती एकाने बसस्थानकावर घातली. हे दांपत्य नगर रस्त्याने पायी चालत निघाले. एका टेम्पोचालकास हात दाखवून त्याला थांबविले. त्याने प्रत्येकी 100 रुपये घेऊन शिक्रापूर येथे सोडले.

आणखी वाचा - मुंबई-पुण्यात पसरली अफवा; वाचा सविस्तर बातमी
साहेबराव म्हणाले, "पुसद तालुक्‍यात आमचे गाव आहे, आम्ही गावाकडे निघालो आहोत असा निरोप दिला आहे. रस्त्यावर थांबून गाडीला हात दाखवायचा थांबली तर ठिक नाही तर चालत निघायचे. गावाकड गेल्याशिवाय चैन पडणार नाही.'' 

आणखी वाचा - पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाली पगार कपात 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Labor couple stuck in Pune is struggling to reach Pusad village