Pu La Deshpande Garden : पु. ल. देशपांडे उद्यानाची भव्यता पडतेय फिकी ; आकर्षक विद्युत रोषणाईचा अभाव

शहरातील सर्वांत मोठे आणि सुंदर उद्यान म्हणून सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाची ओळख आहे. मात्र अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर या उद्यानाची भव्यता फिकी पडत आहे.
Pu La Deshpande Garden
Pu La Deshpande Garden sakal

पुणे : शहरातील सर्वांत मोठे आणि सुंदर उद्यान म्हणून सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाची ओळख आहे. मात्र अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर या उद्यानाची भव्यता फिकी पडत आहे. जपानी पद्धतीने वाढवलेली झाडे, नागमोडी ओहोळ नागरिकांना बघता येत नाहीत. तेथील कारंजे, झाडांच्या परिसरात आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केल्यास हा परिसर उजळून निघेलच, शिवाय नागरिकांना आनंद लुटता येणे शक्य होणार आहे.

जपानमधील ओकायामा शहराच्या धर्तीवर जपान सरकारच्या सहकार्याने महापालिकेने विख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांच्या नावाने हे ‘पुणे-ओकायामा मैत्री उद्यान’ २००६ मध्ये तयार केले आहे. यामध्ये पॅगोड्यावरून संपूर्ण उद्यानावर नजर टाकता येते, पण सायंकाळी अंधार पडल्यानंतर उद्यानात साधे दिवे लावले जातात. मात्र, तळ्यातील कारंजे, धबधबे, जपानी पद्धतीने वाढवलेली झाडे नागरिकांना स्पष्ट दिसत नाहीत, ही आकर्षक वाटत नाहीत. महापालिकेने उद्यानातील ओहोळ, तळे, कारंजांमध्ये रंगीबेरंगी दिवे सोडले, झाडांच्या जवळ प्रकाशव्यवस्था केल्यास उद्यान आणखी सुंदर दिसू शकते, पण सध्या अशी स्थिती नसल्याने आनंद घेता, येत नाही. नागरिकांना फोटोही व्यवस्थित काढता येत नाहीत.

उद्यानाची वैशिष्ट्ये

  • ४० हजार चौरस मीटर उद्यानाचे क्षेत्रफळ

  • हिरवळ, तळे, धबधब्याचा समावेश

  • जपानी पद्धतीने कटिंग केलेली झाडे, पाण्यातील विविधरंगी मासे, नागमोडी ओहोळांचे नागरिकांना आकर्षण

  • सुट्टीच्या दिवशी सुमारे अडीच ते तीन हजार, तर इतर दिवशी ८०० ते ९०० नागरिक उद्यानाला भेट देतात

Pu La Deshpande Garden
Pune Airport : विमानापर्यंतचा प्रवास कासवगतीने! सुविधा कोलमडल्या; विमानतळावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

मी मैत्रिणींसह पु. ल. देशपांडे उद्यानात संध्याकाळी फिरायला आले. अंधार पडल्यानंतर हे उद्यान भव्य असूनही त्याचा आनंद घेता आला नाही. विद्युत रोषणाई असती, तर छान वाटले असते.

- दीप्ती कुलकर्णी, नागरिक

उद्यानात अंधार पडल्यानंतर आकर्षक वाटावे यासाठी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना दिल्या जातील. यासाठी ‘जी २०’साठी आलेल्या निधीतून काम करणे शक्य आहे.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

जपानी उद्यानात नैसर्गिक प्रकाश महत्त्वाचा

जपानमधील ओकायामा उद्यान हे केवळ दिवसाच खुले असतात, त्यामुळे त्यामध्ये नैसर्गिक प्रकाशाला महत्त्व आहे, पण पुण्यातील वातावरण जपानपेक्षा भिन्न असल्याने हे उद्यान सायंकाळी खुले ठेवले जात आहे. विद्युत विभागासोबत विद्युत रोषणाईबाबत चर्चा केली जाईल, असे उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com