
Lady Don Hina Shaikh : पुणे शहरात गुंड-मवाली लोकांच्या काळ्या कृत्यांची अधूनमधून झलक दिसत असते. कोयता गँगवाले तरुण, हातात बंदुका घेऊन रील बनवणारे गँगस्टर हे कमी होते ते काय आता एक महिला गुंडही पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर दहशत माजवताना दिसून आली आहे. लेडी डॉन हिना शेख अशी तिची ओळख असून अनेकदा तिनं फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून जबरदस्तीनं हप्ते वसूल केले आहेत.
याची खबर पोलिसांना असतानाही त्यांचं अभय असल्यानंच तिच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही, अशी चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. नुकताच या गुंड महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पाथारी व्यवसायिक मुलाकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करत आहेत, तसंच त्याच्या मालाची नासधूस देखील तिनं केल्याचं यात दिसत आहे.