इंदापूर, दौंडकरांचं टेन्शन मिटलं; तालुक्यातील सगळे तलाव फुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांची उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता 29.15 टीएमसी आहे. सध्या प्रकल्पात 29.09 टीएमसी (99.77 टक्‍के) साठा उपलब्ध आहे.

पुणे : सिंचनासह नागरिकांना पिण्यासाठी इंदापूर आणि दौंड तालुक्‍यातील तलाव भरून घेण्यात आले आहेत. तसेच, या भागात पुरेसा पाऊस झाल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून पावसाळी आवर्तन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. 

मराठा क्रांती मोर्चा धडकणार राजकीय पक्ष कार्यालयांवर; पुण्यात होणार आक्रोश आंदोलन!​

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांची उपयुक्‍त पाणीसाठा क्षमता 29.15 टीएमसी आहे. सध्या प्रकल्पात 29.09 टीएमसी (99.77 टक्‍के) साठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो 29.04 टीएमसी (99.60 टक्‍के) होता. भीमा खोऱ्यातील जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. 

धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
खडकवासला 1.97 (100) 
पानशेत 10.65 (100) 
वरसगाव 12.82 (100) 
टेमघर 3.64 (98.19) 

कर्जहप्त्यावरील व्याज माफ करा; पुण्यातील व्यावसायिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव​

इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 
पवना - 8.51 (100) 
भामा आसखेड - 7.56 (98.59) 
मुळशी - 18.46 (100) 
कळमोडी - 1.51 (100) 
चासकमान - 7.46 (98.48) 
आंद्रा - 2.92 (100) 
गुंजवणी - 3.69 (100) 
भाटघर - 23.51 (100) 
नीरा देवघर - 11.73 (100) 
वीर - 9.41 (100) 
डिंभे - 12.49 (100) 
उजनी - 53.57 (100)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakes in Indapur and Daund taluka filled for irrigation this year