

Three Leopard Cubs Found in Sugarcane Field Lakhangaon
Sakal
पारगाव : लाखणगाव ता. आंबेगाव येथील वाण्याचा मळा येथे आज शनिवारी ऊसतोड सुरु असताना ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण दत्तात्रय बाणखेले यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याचे तीन बछडे आढळून आले त्यामुळे एकच खळबळ उडाली खबरदारीचा उपाय म्हणून त्या शेतातील ऊसतोड थांबवण्यात आली.