शिरूर-भिमाशंकर राज्यमार्गावर शिरगांव येथे दरड कोसळली, वाहतुक ठप्प

सोमवार व त्यातच पावसाचा आनंद घेत श्री क्षेत्र भिमाशंकराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक गेले. मात्र, सायंकाळी परतत असतानाच त्यांच्या मार्गात विघ्न आले.
landslide on Shirur Bhimashankar state highway
landslide on Shirur Bhimashankar state highwaysakal
Summary

सोमवार व त्यातच पावसाचा आनंद घेत श्री क्षेत्र भिमाशंकराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक गेले. मात्र, सायंकाळी परतत असतानाच त्यांच्या मार्गात विघ्न आले.

चास - मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शिरूर-भिमाशंकर राज्यमार्गावर शिरगांव (ता. खेड ) येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली, सुदैवाने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही, वाहतुक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

सोमवार व त्यातच पावसाचा आनंद घेत श्री क्षेत्र भिमाशंकराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक गेले. मात्र, सायंकाळी परतत असतानाच त्यांच्या मार्गात विघ्न आले. मुसळधार पावसाने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच सोमवारी सायंकाळी शिरगांव गावाच्या हद्दीत शिरूर-भिमाशंकर या मार्गावर दरड कोसळली व हा मार्ग ठप्प झाला. घराकडे परतणाऱ्या वाहणांची संख्या मोठी असल्याने एका बाजूला वाहणांच्या मोठ्या रांगा लागल्या.

भिमाशंकर येथील बंदोबस्त करून परतत असताना खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सतीष गुरव यांच्या निदर्शनास हि बाब आल्यावर त्यांनी तातडीने जेसीबी मशीन बोलावून रस्ता खुला करण्यास सुरूवात केली. सुमारे दोन तासानंतर पुन्हा वाहतुक सुरळीतपणे सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com