Landslides Sinhagad Ghat : सिंहगड घाटरस्त्यावर चार ते पाच ठिकाणी कोसळली दरड; निधी पडून, प्रशासनाचे कामांकडे दुर्लक्ष

सतच्या पावसामुळे सिंहगडाच्या घाट रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना
landslides sinhagad ghat
landslides sinhagad ghatsakal

सिंहगड : सतच्या पावसामुळे सिंहगडाच्या घाट रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने रात्रीच्या वेळी दरड कोसळली असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र रविवारी दिवसा घाट रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यावेळी जर दरड कोसळली असती तर मोठी अनुचित घटना घडली असती.

landslides sinhagad ghat
Sinhagad Landslide : सिंहगड घाट रस्त्यावरील दरडींचा धोका या पावसाळ्यातही राहणार कायम; नागरिकांचा जीव धोक्यात

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मागील वर्षी दरड कोसळून एका तरुण ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच दरड कोसळल्याने अनेक वेळा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता.

सकाळ'ने वारंवार या धोकादायक दरडींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर दरड प्रतिबंधक कामासाठी सुमारे दिड कोटींचा निधी वन विभागाने वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे मात्र अद्याप साधे अंदाजपत्रकही मंजूर झालेले नाही.

यावर्षी पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात पुणे दरवाजाजवळ उंच कड्यावरून दगड कोसळले होते. आता घाट रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या घाट रस्त्यावरील पहिल्या तीव्र वळणाच्या ठिकाणी मोठी दरड कोसळली असून अर्ध्या रस्त्यावर दगडमातीचा ढीग पडलेला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.

landslides sinhagad ghat
Landslides Alert: पुढील ४८ तास महत्त्वाचे, 'माळीण'सारखी घटना घडण्याची भीती, राज्यातील 'या जिल्ह्यांना धोका

मात्र वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामधील समन्वयाअभावी पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सिंहगडाच्या पायथ्याशी तपासणी नाक्यावरील उपद्रव शुल्क गोळा करण्याचे काम वगळता इतर कोणत्याही कमाकडे वन विभागाचे अधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत.

मागील वर्षी वन विभागाचे अधिकारी घाट रस्त्यावरील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी परिणामकारक प्रयत्न करताना दिसत होते. यावर्षी मात्र सर्व काही 'रामभरोसे' कारभार सुरू असल्याचे दिसून येत असल्याने पर्यटकांना येत्या काळातही गैरसोय सहन करावी लागणार आहे.

landslides sinhagad ghat
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सुविधांचा अभाव! दोनशे किमीमध्ये नाही अग्निशमन केंद्र; वाहन जळाल्यास प्रवाशांचा मृत्यू अटळ

प्रशासनाला गांभीर्य का नाही? शनिवार व रविवारी पंधरा ते वीस हजार पर्यटक सिंहगडावर येतात. अरुंद घाट रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी जर दरड कोसळली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. असे असताना घाट रस्त्यावर ना वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत प्रशासनाचे नियोजन ना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची कोणती व्यवस्था आहे.

"तातडीने कर्मचारी पाठवून रस्त्यावरील दरड हटवून घेतली जाईल."

- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक,सिंहगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com