महिलेबाबत घडलेली घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू...

महिलेबाबत घडलेली घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू...

घोडेगाव : वय वर्षे 50...गेली पंचवीस वर्षे एकट्या महिला शकुंतला गुलाब पारधी आपल्या झोपडीत राहून उदरनिर्वाह करत होत्या. पण तेही देवाला पाहवले नाही. याच झोपडीला आग लागून सर्वच कागदपत्रे, वस्तूंची व पैशांची राखरांगोळी झाली. नारोडी (ता. आंबेगाव) येथील खेबडशेत वस्तीवर ही घटना रविवार (ता. १७) दुपारी एक वाजता झाली. या आगीतून काहीही वाचले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुजित पिंगळे यांनी सांगितले.

नारोडी येथील खेबडशेत वस्तीवर शकुंतला पारधी या महिला गेल्या पंचवीस वर्षांपासून वास्तव्य करत होत्या. स्वतःच्या मेहनतीने स्वरक्षणासाठी झोपडी बांधून त्या राहत होत्या. दिवसभर शेताच्या कामावर जायचे आणि रात्रभर या झोपडीत विसावा करायचा. असा त्यांचा नित्यक्रम होता. रविवारी त्या नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता कामावर गेल्या आणि दुपारी एक वाजता अचानक त्यांच्या झोपडीला आग लागली.

जवळच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यात यश आले नाही. या आगीत दोन कपाटे, चार पोती धान्य, तांदूळ, टीव्ही, संसारोपयोगी भांडी, दीड तोळे सोने, साड्या व रोख 40 हजार रुपये आगीत भस्मसात झाले.

तसेच रेशन कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, आधार कार्ड जळून गेली. यातून कोणतीही वस्तू अगर कागद वाचला नाही. गावचे तलाठी ए. एस. खोटे यांनी सरपंच कैलास काळे, सुजीत पिंगळे, पोलीस पाटील रामचंद्र नाईक, अरुण पिंगळे, दत्ता जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. तहसील कार्यालय यांनी त्वरित मदत करण्याची गरज असल्याचे सूजीत पिंगळे यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com