पुणे जिल्ह्यातील या तालुक्यांत सुरू आहे कोरोनाचा धुमाकूळ

corona1
corona1

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. 
  
शिरूर तालुक्‍यात पाचशेचा टप्पा पार 
शिरूर :
शिरूर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने बुधवारी पाचशेचा टप्पा पार केला. शहरातील एका ज्येष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात शहर व तालुक्‍यात 35 नवे रुग्ण सापडले. तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 521 झाली असून, तब्बल 250 जण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. बुधवारी शिरूरमध्ये सहा, विठ्ठलवाडी व पिंपळे धुमाळ येथे प्रत्येकी पाच, शिक्रापूर, रांजणगाव गणपती व शिरूर ग्रामीणमध्ये प्रत्येकी तीन, आपटी व तर्डोबाची वाडी येथे प्रत्येकी दोन; तसेच धानोरे, वाजेवाडी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, कारेगाव व नागरगाव येथे प्रत्येकी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

पुरंदरमध्ये तीन दिवसांत 89 रुग्ण 
सासवड :
पुरंदर तालुक्‍यात गेल्या 72 तासांत कोरोनाचे 89 रुग्ण वाढले. बुधवारी सासवडमधील एका व्यापाऱ्यासह खासगी डॉक्‍टरला बाधा झाली. सासवडला सहा, जेजुरीत 12, बेलसरला सहा, कुंभारवळण, जेऊरला प्रत्येकी तीन, असे 30 रुग्ण आढळले. एकूण आकडा 627 वर पोचला. 

खेडमध्ये दिवसभरात 70 बाधित 
राजगुरूनगर :
खेड तालुक्‍यात गेल्या 24 तासांत 70 कोरोनाबधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्या 1608 झाली आहे. तालुक्‍यात तिघे जण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. राजगुरुनगरमधील दोन ज्येष्ठ, शेलपिंपळगावमधील एक अशा तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. आज चाकणला 10, राजगुरूनगरला 6 आणि आळंदीत 7 रुग्ण आढळले. चऱ्होलीला 7, शेलपिंपळगावात 5, सोळू, महाळुंगे, वडगाव घेनंद येथे प्रत्येकी 3, काळूस, राक्षेवाडी, रानमळा, नाणेकरवाडीला प्रत्येकी 2 रुग्ण सापडले. रेटवडी, खरपुडी, पूर, कोयाळी, भोसे, शिरोली, वाकी बुद्रुक, सातकरस्थळ, वडगाव पाटोळे, देवोशी, आसखेड, कोये, वहागाव, शेलू, निघोजे, मेदनकरवाडी, खराबवाडी, वासुली या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 

वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठाचा मृत्यू 
वेल्हे :
वेल्हे तालुक्‍यातील पानशेत परिसरातील कुरण बुद्रुक गावातील 70 वर्षीय ज्येष्ठाचा कोरोनाने मृत्यू झाला. बुधवारी आणखी दोन जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत तालुक्‍यातील चार ज्येष्ठांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी दिली. बुधवारी करंजावणे व दापोडे गावातील प्रत्येकी एकास संसर्ग झाला असून बाधितांची संख्या 141 वर पोचली आहे. 115 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

मुळशीत आणखी 15 जणांना संसर्ग 
पिरंगुट :
मुळशी तालुक्‍यात कोरोनाचे आज नवीन 15 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या आता 695 झाली आहे. हिंजवडी येथे 8, घोटावडे 4 तर माण येथे 3 रुग्ण आज सापडले आहेत. कोरोनामुळे म्हाळुंगे येथील एकाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर तालुक्‍यातील मृतांची संख्या 22 पोहोचली आहे. सध्या रुग्णालयात 171 रुग्ण उपचार घेत आहेत. 

दौंडला आणखी सात जणांना बाधा 
दौंड :
दौंड तालुक्‍यात आणखी सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड शहरातील 4 महिला व गोपाळवाडी (ता. दौंड) येथील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. तसेच कुरकुंभ येथील 19 वर्षीय युवक आणि सहजपूरमधील 53 वर्षीय नागरिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.

आंबेगावात दोन जणांचा मृत्यू 
मंचर :
आंबेगाव तालुक्‍यात बुधवारी कोरोनाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील रुग्णांची एकूण संख्या आता 342 झाली आहे. तसेच या रोगाने आतापर्यंत सात जणांना मृत्यू झाला आहे. तालुक्‍यातील जवळपास 50 टक्के गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे प्रशासन व नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने सहा ऑक्‍सिजन रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अवसरी खुर्द, गंगापूर खुर्द, खडकी, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक, पिंपळगाव-खडकी, जाधववाडी येथे प्रत्येकी एक व शिनोली येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. खडकी व शिनोली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

बारामतीत 16 जणांना संसर्ग 
बारामती :
शहर व तालुक्‍यात आज 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. शहरातील खाटिक गल्ली, रुई, प्रगतीनगर, तांदुळवाडी, कृषीदेवतानगर, समर्थनगर, सुहासनगर, रामगल्लीतील तर ग्रामीण भागात गुनवडी, माळेगाव बुद्रुक, बऱ्हाणपूर, निंबोडी येथील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत राहिली तर बारामतीत आरोग्य सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनातर्फे तयारी सुरू आहे. वसतीगृहांसह इतरही जागा आयसोलेशनच्या दृष्टीने निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

नारायणगावातील बाधिताचा मृत्यू 
जुन्न :
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कोरोनाबाधित 52 वर्षीय व्यक्तीचा पुणे येथे उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. यामुळे तालुक्‍यातील मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत बेल्हे-5, आळे-3, मंगरूळ-2, राजुरी, कांदळी-नगदवाडी, शिरोलीतर्फे आळे, जुन्नर, वारुळवाडी येथे प्रत्येकी एक अशा एकूण पंधरा नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.4) एकच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com