पुणे : शंखीगोगलाईंनी रात्रीतूनच केलं शेत फस्त!

conch snails
conch snailssakal media

पारगाव : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील वैदवाडी व कापडदरा परिसरातील शेतकरी महाकाय शंखी गोगलगाईच्या प्रार्दुभावाने त्रस्त झाले आहे. दररोज शेकडोच्या संख्येने शेतात घुसलेल्या गोगलगाई काही वेळातच शेतातील उभी पिके फस्त करत आहे. गोगलगाई निर्मुलनासाठी वनविभाग व कृषीविभागाने शेतकर्यांना सहकार्य करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे. वैदवाडी व कापडदरा परीसरात वनविभागाच्या हद्दी लगत असलेल्या शेतात दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर दररोज पहाटे पाठीवर मोठ्या आकाराचा शंख असलेल्या सुमारे सहा ते सात इंच लांबीच्या या गोगलगाई शेकडोच्या संख्येने शेतात घुसतात. शेतात असलेले पालेभाज्या विशेष करुन फ्लावर, कोबीची पाने खाऊन फस्त करतात.मारुती बढेकर यांनी एक एकर क्षेत्रात फ्लावरची लागवड केली आहे. एका आठवड्यात गोगलगाईच्या प्रार्दुभावामुळे निम्याहुन जास्त क्षेत्रातील पिकांची पाने गोगलगाईंनी फस्त केली आहे.

conch snails
पिंपरी-चिंचवडमध्ये आज २२४ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

दररोज सकाळी शेतात जाऊन या गोगलगाई गोळा करुन दुर नेऊन नष्ट कराव्या लागत असल्याचे बढेकर यांनी सांगीतले. ऊन पडल्यानंतर या गोगलगाई शंखात जाऊन ओलावा असलेल्या जमीनीत घुसुन राहतात. पहाटे पुन्हा जमीनीच्या बाहेर येऊन शेतातील पिकांचे पाने फस्त करतात. या गोगलगाईंचा त्रास पावसाळा व हिवाळ्यात जास्त होतो. उन्हाळ्याच त्या जमीनीत जातात दोन ते तीन महीने अन्नाशिवाय त्या जमीनीत असतात पावसाळ्याला सुरुवात झाली की त्या जमीनीवर येतात या महाकाय शंखी गोगलगाईच्या शेतातील पिकांवरील हल्ल्यामुळे भाजीपाला तसेच तरकारी पिक घेणार्या शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.

conch snails
दिलासा! पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या हजारच्या आत

पावसाळ्यात ओलावा असणाऱ्या सर्वच शेतांमध्ये गोगलगाईंचा त्रास होत असतो. त्यामुळे ज्या प्रकारे दरवर्षी ऊस पिकातील हुमणी किडीच्या निर्मुलनासाठी साखर कारखाने, कृषी विभाग व शेतकरी सामुहीक मोहीम राबवतात त्याच प्रकारे या हानीकारक गोगलगाईंच्या निर्मुलनासाठी वनविभाग व कृषीविभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन मदत करावी अशी मागणी टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com