पुण्यातील जनता वसाहतीत कोरोना रोवतोय पाय: गेल्या 9 दिवसात...

In the last 9 days 42 patients were found at Janata colony in Pune and four died
In the last 9 days 42 patients were found at Janata colony in Pune and four died

पुणे : कोरोनाच्या संसर्गापासून 52 दिवस सुरक्षित राहिलेल्या जनता वसाहतीत गेल्या नऊ दिवसात 42 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्वांत मोठ्या असलेल्या या वसाहतीला कोरोनाच्या विषाणूने आपला विळखा घट करायला सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरात नऊ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या काळात शहरातील अन्य भागात विशेषतः पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. परंतु स्वयंशिस्त आणि जागृकता दाखवत जनता वसाहतीतील नागरिकांना आपल्या वसाहतीमध्ये शिरकाव करून दिला नव्हता. त्यामुळे शहरात या वसाहतीचे कौतुक झाले होते. 
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर नऊ दिवसांपूर्वी म्हणजे 14 मे रोजी या वसाहतीला ग्रहण लागले. पहिला विषाणूचा बाधित रुग्ण या वसाहतीमध्ये सापडला. त्यापाठोपाठ त्या रुग्णाच्या संपर्कातील चार जणांना देखील त्यांची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. नऊ दिवसात ही संख्या 42 वर पोचली आहे. वसाहतीमध्ये पहिला सापडलेल्या वयोवृद्ध रुग्ण मरण पावला. गेल्या काही दिवसात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वीस वर्षीय तरुणाचा समावेश आहे. लागण झाल्यानंतर तातडीने उपचार घेणे अपेक्षित होते. मात्र त्या तरूणांने अंगावरच ते काढल्याने उपचारासाठी उशिरा झाल्यामुळे त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे वसाहतीतील नागरिकांकडून सांगण्यात आले. 
सुमारे शंभर एकर जागेवर ही वसाहत वसली आहे. वसाहतीमध्ये एकूण 116 गल्या आहेत. तर सत्तर हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे सध्या दहा गल्या सील करण्यात आल्या आहेत. तेथील रहिवाशांना आता घरपोच धान्य किट पोचविण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com