esakal | निधी कसा आणायचा, हे वळसे पाटलांकडून शिका
sakal

बोलून बातमी शोधा

dipip walse patil

निधी कसा आणायचा, हे वळसे पाटलांकडून शिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंचर: “उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना दिलीप वळसे पाटील यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात क्रांती केली. अभियांत्रिकी व तंत्र निकेतन महाविद्यालयांची परवानगी सुलभ केली. त्यांच्या पुढाकारातून अवसरी खुर्द गावात शासकीय तंत्र निकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन देखण्या इमारती उभ्या आहेत. सरकारमध्ये असो किंवा नसो मतदार संघात योजना व निधी कशा पद्धतीने आणायचा, हे वळसे पाटील यांच्याकडून शिकून घेण्यासारखे आहे,” असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ व अत्याधुनिक सभागृह भूमीपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय राऊत, शिवाजीराव आढळराव पाटील, अतुल बेनके, पोपटराव गावडे, देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, विष्णू हिंगे, मानसिंग पाचुंदकर, भगवानराव वाघ, भगवान शिनलकर, अरुणा थोरात, संजय गवारी, संतोष भोर, जगदीश अभंग उपस्थित होते.

पवार म्हणाले, “उदय सामंत यांनी रत्नागिरीला इंजिनिअरिंग कॉलेज करताना वळसे पाटील यांचे मार्गदर्शन घ्यावे. वळसे पाटील यांनी मिळालेल्या पदाचा उपयोग नेहमीच सामान्य जनतेसाठी केला आहे.”

हेही वाचा: गुन्हेगाराचा ४ दिवसांपूर्वीच खून, मृतदेह शनिवारी कालव्यात सापडला

दिलीप वळसे पाटील म्हणाले, येथील महाविद्यालयांना निधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामंत यांनी सहकार्य केले आहे. ३६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामध्ये शेतकरी व गरीब कुटुंबातील मुलांची संख्या अधिक आहे. सामंत म्हणाले, महाराष्ट्राचा उच्च तंत्रशिक्षण विभाग हा देशातला सर्वोत्तम विभाग म्हणून ओळखला जाईल.

एवढे काम यापूर्वी वळसे पाटील यांनी करून ठेवले आहे. अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाप्रमाणे रत्नागिरी येथील महाविद्यालय व परिसर तयार केला जाईल. त्यासाठी वळसे पाटील यांचे सहकार्य घेऊ. राऊत म्हणाले, “उच्च तंत्र शिक्षणाचा अवसरी पॅटर्न कोकणात राबविला जाईल. अवसरी येथे दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन फुलले आहे.”

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आढळराव पाटील यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.

loading image
go to top