esakal | सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी
sakal

बोलून बातमी शोधा

 महापालिकेचा दवाखाना

सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : सुखसागर नगर मधील राठी विहिरी शेजारी असणारा महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. एखाद्या खाजगी दवाखान्यांप्रमाणे उपचार मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत. त्यातच कोरोनासारख्या काळात हे रुग्णालय आणखीनच जिव्हाळ्याचे बनले आहे. सर्वसामान्यांपासून मोठी मंडळीही येथे तपासणी, लसीकरण आदी निदानासाठी जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: पाटसमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, सव्वाचार तोळे सोने, रोख रक्कमेची चोरी

या दवाखान्यांत बाह्यरुग्ण विभाग, जनरल ओपीडी, दहा वर्षापर्यंतच्या मुलांचे लसीकरण, गर्भवती महिलांना मोफत लसीकरण आणि तपासणी व औषधोपचार करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत तपासणी व उपचार, शहरी गरीब योजना, अशंदायी वैद्यकीय साहाय्य योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आदी योजनांचा लाभही नागरिकांना घेता येत आहे. त्याचबरोबर या आरोग्य केंद्रात रक्त लघवी तपासणी साठी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे. याची नागरिकांना अल्प दरात सेवा पुरवली जात आहे. तर ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला शहरी गरीब योजना आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मोफत सेवा दिली जाते. महापालिकेच्या या दवाखान्यात पल्स पोलिओ लसीकरण, मोहिम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवले जातात. या दवाखान्यात दिवसाला १५० ते १६० रुग्ण आणि दरमहा ४ ते साडेचार हजार रुग्ण उपचार घेतात. दवाखान्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक फार्मासिस्ट, एक लिपीक, दोन ड्रेसर, एक सफाई कामगार, तीन सेक्युरिटी गार्ड आणि दोन कर्माचारी असे एकूण जवळपास ११ कर्माचारी काम पाहत आहेत.

हेही वाचा: पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल

लसीकरण

कोरोनाच्या साथीनंतर लसीकरण हे महत्वाचे बनले. शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी आणि गोंधळ दिसून येत असताना मात्र, या दवाखान्यात शांततापूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळ गडबड होत नाही. आतापर्यंत या केंद्रावर जवळपास १२ हजाराहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी वर्षा खेडेकर रूग्णांची योग्य तपासणी करून त्यांना मानसिक आधार तर देतातच शिवाय त्या फोनवरूनही रुग्णांच्या अनेक शंकांचे निरसण करत असतात. एकूण नियोजनबद्ध पद्धतीने या दवाखान्यात कारभार चालत असल्याने या दवाखान्यांतील आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांविषयी नागरिक समाधान व्यक्त करतात.

हेही वाचा: मतदार यादीत युवकांची टक्केवारी वाढविण्याची गरज

या भागातील नागरिक घेतात उपचार

सुखसागरनगर भाग १, भाग २, गोकुळनगर, कात्रज, साईनगर, राजस सोसायटी, गुजर-निंबाळकरवाडी, आनंदनगर, राजीवगांधीनगर आदी भागांतून उपचार घेण्यासाठी नागरिक या दवाखान्यात येतात.

या सुविधांची आवश्यकता

  • दंतचिकित्सा विभाग

  • डोळ्यांच्या तपासण्या

  • गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा

  • कोविड चाचण्या होण्याची गरज

हेही वाचा: पुणे : व्यवसायिकाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपीस अटक

"मी कोरोनाचे दोन्ही डोस या दवाखान्यात घेतले असून आरोग्य सेवांचाही लाभ घेतला आहे. लसीकरण तर एकूणच शिस्तबद्ध पद्धतीने चालू असते. कुठलाही गोंधळ दिसत नाही. या भागातील नागरिकांसाठी कठीण काळात हा दवाखाना खरा कोरोनायोद्धा ठरला आहे."

- राहुल काळे, स्थानिक नागरिक

"या दवाखान्यात एखाद्या खाजगी रुग्णालयांप्रमाणे रुग्णांची काळजी घेतली जाते. याठिकाणी चांगल्या सुविधा असून कर्मचाऱ्यांमध्येही आपुलकीची भावना आहे."

- सुजाता आतकरे, स्थानिक महिला नागरिक

"रुग्णांची तपासणी औषधोपचार दवाखान्यातील सेवांबाबत रुग्णांनी दिलेल्या सुचना अभिप्राय तसेच वैद्यकीय सेवेतील तज्ञ मार्गदर्शन यामुळे या पुढील अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी दवाखान्यातील सेवांचा लाभ घ्यावा आणि कोरोनाच्या परिस्थितीत अधिकाधिक काळजी घेऊ लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. तसेच, गर्भवती महिलांनी तपासणी, लसीकरण, औषधोपचार या मोफत मिळणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा."

- वर्षा खेडेकर, वैद्यकीय अधिकारी.

हेही वाचा: पुणे : पालघन, कोयता हातात घेऊन व्हिडीओ करणे पडले महागात

काही चाचण्यांचे दर - तक्ता

महापालिकेच्या दवाखान्यातील दर

  • हिमोग्लोबिन - २० रुपये

  • एचबीए१सी - १४१ रुपये

  • लिपीड प्रोफाईल - २१६ रुपये

  • इन्सुलिंग फास्टिंग - १६३ रुपये

  • रक्तगट - ३३ रुपये

  • हिमोग्राम - १४६ रुपये

loading image
go to top