सरपंचपद कोणाकडे ? 8 डिसेंबरला धाकधूक संपणार

Leaving reservation for Sarpanch post of 89 Gram Panchayats in Haveli taluka on 8th December
Leaving reservation for Sarpanch post of 89 Gram Panchayats in Haveli taluka on 8th December

लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंद, कदमवाकवस्ती, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत ८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी सभागृहात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेली तालुक्यातील तब्बल सत्तरहुन अधिक ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच महिन्यांपुर्वीच संपल्याने, ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक काम पाहात आहेत. वरील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याच्या चर्चा चालू असल्या तरी, गावच्या सरपंचपदी स्त्री की पुरुष बसणार? मग तो कोणत्या प्रवर्गातील असणार? याकडे निवडणुक लढवणाऱ्या इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरपंचपद नेमके कोणाकडे जाणार हे स्पष्ट झाल्यानंतरच, गावपातळीवर राजकारणाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. सध्या मतदार याद्या घेऊन अनेक जण मिरवत असले तरी, गावपातळीवरील राजकारणाला सरपंचपदाच्या आरक्षणानंतरच वेग येणार असल्याने, येत्या मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली
सरपंच पदाच्या आरक्षण सोडत होणार असलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे -
लोणी काळभोर, उरुळी कांचन, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, तरडे, थेऊर, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, कोरेगांवमुळ, नायगांव, न्हावी सांडस, पेठ, प्रयागधाम, सांगवी सांडस, शिंदेवाडी, शिंदवणे, वळती, सोरतापवाडी, बकोरी, भावडी, बिवरी, डोंगरगांव, केसनंद, शिरसवडी, तुळापूर, वढू खुर्द, बहुली, खडकवाडी, कुडजे, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगरूण, औताडे हंडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी, वडकी, डोणजे, घेरासिंहगड, गो-हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सोनापूर, आंबी, जांभळी, मणेरवाडी, वरदाडे, आर्वी, गाऊडदरा, खेडशिवापूर, कोंढणपूर, रहाटवडे, शिवापूर, श्रीरामनगर, मांजरी खुर्द.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

होळकरवाडी, पिसोळी, कल्याण, गोगलवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, कोळेवाडी, जांभूळवाडी, मांगडेवाडी, मालखेड, वडगांव शिंदे, बिवरी, भावडी, खामगांवटेक, सांगरूण, खानापूर, पिंपरी सांंडस, नांदोशी, कदमवाकवस्ती, बुर्केगांव, पेरणे, अहिरे, आव्हाळवाडी, फुलगांव, कोलवडी साष्टे, खामगांव मावळ, वाडेबोल्हाई, वाघोली, आगळंबे, कोंढवे धावडे, किरकटवाडी, न्यू कोपरे, खडकवासला, लोणीकंद, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, नांदेड, देहू व निरगुडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com