शेतकऱयांसाठी लिंबू आंबटच; आवक वाढली पण, दर घसरला

Lemon inflows increased but prices fall in Pune Market Yard
Lemon inflows increased but prices fall in Pune Market Yard

मार्केट यार्ड : पावसाने उघडीप दिल्यानंतर लिंबाना हवामान पोषक झाले आहे. त्यामुळे बाजारात दिवसेंदिवस लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढली असली तरी थंडीमुळे लिंबांना मागणी नाही. त्यामुळे दरातही मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात एका लिंबाला २० ते २५ पैसे दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात दहा रुपयांत सहा ते आठ लिंबांचा वाटा मिळत आहे. 

Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड

लिंबाचे दर घटल्याचा फायदा घेत लोणचे उत्पादकांकडून खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकदा गाडी भाडे पैसे निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांपूर्वी लिंबांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याकाळात लिंबांच्या एका गोणीचा भाव ५०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. एका गोणीत प्रतवारी तसेच आकारमानानुसार  ४०० ते ५५० लिंबे बसतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात लिंबांची आवक वाढली आहे. नगर आणि सोलापूर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. बाजारात रविवारी सात ते आठ हजार गोणी तर इतरदिवशी २ ते ३ हजार गोणी इतकी आवक होत आहे. सध्या लिंबाला ग्राहक कमी असून त्यापैकी जास्त ग्राहक हे लोणचे उत्पादकच आहेत, अशी माहिती फळबाजारातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव​

दोन महिन्यांपूर्वी गोणीचे दर ५०० ते ९०० रुपये होता. त्यावेळी लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले होते. सध्या लिंबांना मिळत असलेले भाव पाहता शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, लिंबाची तोडणी, उत्पादन खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी थंडीत लिंबांना मागणी नसते. थंडी आणि पावसाळ्यात लोणचे उत्पादकांकडून लिंबांची खरेदी केली जाते. तर, फेब्रवारी ते मे महिन्याच्या कालावधित लिंबाना मागणी वाढते. त्यावेळी लिंबांचे दरही तेजीत असतात. सध्या घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीला ७० ते १२० रुपये असे दर मिळत आहे.

पिंपरीत अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणारा अटकेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com