Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारी महिला जखमी; ओतूर हद्दीतील घटना

ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याच्या बंदिस्त जागेत ठेवावे तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी...
leopard attack on two wheeler woman injured or incident forest hospital
leopard attack on two wheeler woman injured or incident forest hospitalsakal

ओतूर : ता.जुन्नर येथील ओतूर पाथरटवाडी मार्गावरून सोमवारी रात्री पाथरटवाडी वरून ओतूर कडे दुचाकीवरून येता असताना अचानक बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून दुचाकीवरील महिलेला जखमी केले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.

या हल्यात दुचाकीवरील अश्विनी समीर घुले वय.२६ ह्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री ओतूर पाथरटवाडी या मार्गावरून समीर घुले हे पत्नी अश्विनी घुले समवेत आपल्या दुचाकीवरून ओतूर येथे येत असताना कॅनॉल लगत असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला करून मागे बसलेल्या अश्विनी घुले यांना जखमी केले.

सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गीते, वनरक्षक विश्वनाथ बेले,वनकर्मचारी फुलचंद खंडागळे यांचे समवेत स्थानिक विशाल घुले, सुधाकर घुले, अमोल गीते,अजय मालकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर येथे पाठवले.

leopard attack on two wheeler woman injured or incident forest hospital
Pune Crime : कर्जाची परतफेड करूनही जीवे मारण्याची धमकी, सावकारासह दहाजणांविरुद्ध गुन्हा

तसेच सदर घटने नंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार कॅनॉल लगत पिंजरा लावण्यात येणार असल्याची वनविभागाकडून माहिती देण्यात आली. ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे ,समूहाने फिरणे,सोबत बॅटरी व मोबाईलवर गाणी वाजवणे, पशुधन सुरक्षित बंदिस्त गोठ्यात ठेवणे.

तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याच्या बंदिस्त जागेत ठेवावे तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com