Leopard : जखमी अवस्थेत आढळला बिबट्याचा बछडा

शिंगवे (ता. आंबेगाव) येथील कासार मळा परीसरात एक वर्ष वयाचा बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला आहे.
Injured Leopard
Injured Leopardsakal

निरगुडसर - शिंगवे (ता. आंबेगाव) येथील कासार मळा परीसरात एक वर्ष वयाचा बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना (ता.१) रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.

शिंगवे जवळील कासार मळा येथील शेतकरी अनिल शिंदे दुपारी शेतात गेले असता त्यांना डाळिंबाचे शेतामध्ये बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले असता वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली, त्यानंतर जखमी बिबट्याला उपचारासाठी माणिकडोह याठिकाणी हलवण्यात आले आहे. बिबट्याची प्रकृती स्थिर असून त्यावर उपचार सुरु आहेत.

जखमी बिबट्या नर जातीचा असून साधारण एक वर्ष वयाचा आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com