

Forest officials rescue a three-to-four-month-old leopard cub trapped inside a farm well in Bharadi
Sakal
निरगुडसर : भराडी(ता)आंबेगाव येथील जितेंद्र गावडे यांच्या शेतातील विहिरीत तीन ते चार महिन्याचा बछडा सोमवार (ता.२४)पडला,वनविभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर या बछड्याला विहिरीत पिंजरा सोडून सुखरूप पकडण्यात यश आल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली. भराडी येथील शेतावरील विहिरीत बिबट्या पाण्यात असल्याचे काही शेतकऱ्यांना सोमवारी सकाळी निदर्शनास आले.