

Women in Pimparkhed village wear spiked collars as protection against leopard attacks.
Sakal
-संजय बारहाते
टाकळी हाजी: पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांनी सर्वसामान्य जनतेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भीतीवर मात करण्यासाठी शेतकरी महिलांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्या आता गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालून शेतीत काम करत आहेत! हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणतं, पण ग्रामीण महिलांची धैर्यपूर्ण झुंजही त्यातून दिसून येते.