

Midnight Operation: Leopard Caught in Cage at Talegaon Dhamdhere
Sakal
-नागनाथ शिंगाडे
तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्तीवर हुलकावणी देणारा दीड ते दोन वर्षाचा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सदर बिबट्याला आज मंगळवारी माणिकडोह येथे सोडण्यात आले असल्याचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.