Leopard : बिबट्या पळाला, पण वरिष्ठ अंधारात

मानवी वस्तीला लागून असलेल्या १३० एकरमध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय विस्तारलेले आहे. त्यातील एक बिबट्या गायब होऊन अनेक तास उलटून गेले तरीही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Katraj Zoo
Katraj Zoosakal

पुणे - मानवी वस्तीला लागून असलेल्या १३० एकरमध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय विस्तारलेले आहे. त्यातील एक बिबट्या गायब होऊन अनेक तास उलटून गेले तरीही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. ही गंभीर घटना घडून देखील महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना ही माहिती मिळण्यास १२ तासापेक्षा जास्त कालावधी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्मार्ट महापालिकेच्या प्रशासनातील असमन्वय अन् ढिसाळ कारभार समोर आला आहे.

कात्रज येथे पुणे महापालिकेच्या मालकीचे प्राणी संग्रहालय आहे. याठिकाणची सुरक्षा, प्राण्याचे खाणे पिणे, आरोग्य, देखभाल यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी आणल्यानंतर त्यांना पुण्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी म्हणून काही आठवडे विलगीकरण कक्षात ठेवले जाते. याच विलीनीकरणाच्या कक्षातून साडे सात वर्षाचा ‘सचिन’ नावाचा बिबट्या गायब झाला. तो ३६ तास उलटून गेले तरी हाताला लागलेला नाही.

दरम्यान यासंदर्भात बिबट्या गायब झाला ही माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात शोध मोहिमेत वेळ वाया घातल्याचाही प्रकार समोर आला आहे. भारतीय सर्प विज्ञान केंद्र सकाळी ११च्या सुमारास प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांना कळविण्यात आले. त्यानंतर लगेच जाधव यांनी उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे यांनी ही माहिती कळवली.

मात्र, त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना प्राणी संग्रहालयातून बिबट्या गायब झाला असल्याची माहिती सायंकाळी सातच्या सुमारास कळाली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात आयुक्तांना माहिती दिली.

रात्री १० वाजून गेल्यानंतरही बिबट्या सापडत नसल्याचे लक्षात आल्याने त्यानंतर अतिरिक्त आयुक्त ढाकणे हे प्राणी संग्रहालयात गेले. पहाटे पाच वाजेपर्यंत ते तेथील परिस्थिती हाताळत होते. सुदैवाने हा बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या बाहेर गेला नाही, पर्यटकांपर्यंत तो पोचू शकला नाही. पण या घटनेचे गांभीर्य ओळखून याची वेळीच माहिती अधिकाऱ्यांना देणे आवश्‍यक होते.

प्राणी संग्रहालयाचे संचालक जाधव म्हणाले, ‘मला सकाळी अकराच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर याची माहिती उद्यान अधिक्षकांना दिली होती. त्यानंतर आम्ही शोध मोहिमेतच होतो. उद्यान अधिक्षक घोरपडे म्हणाले, ‘सकाळी ११ च्या सुमारास ही माहिती मिळाली. अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना दुपारी यासंदर्भात कळविण्यात आले होते.

अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले, ‘सायंकाळी सातच्या सुमारास मला यासंदर्भात माहिती मिळाली, त्यानंतर आयुक्तांनाही कळविण्यात आले. रात्री १० च्या सुमारास आयुक्तांशी चर्चा करून मी प्राणी संग्रहालयात गेलो होतो. पहाटे पाच पर्यंत शोध मोहिमेत सहभागी होतो.

शोध मोहीम संपल्यानंतर चौकशी

बिबट्याला पकडून त्याला पुन्हा पिंजऱ्यात टाकण्याची ही मुख्य जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे ही मोहीम संपेपर्यंत अन्य कोणत्याही विषयाला हात घातला जाणार नाही. बिबट्या सापडल्यानंतर यात कोणाचे दुर्लक्ष झाले, व्यवस्थित निरोप का पोचवले नाहीत, प्राणी संग्रहालय सुरु का ठेवले यासह अन्य कारणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

साडे सात वर्षानंतर सचिनचा मुक्तसंचार

पुणे महापालिकेने सुमारे दोन महिन्यांपूर्वी हंपी येथून साडे सात वर्षाचा ‘सचिन’ नावाचा बिबट्या प्राणी संग्रहालयात आणला होता. या बिबट्याचा जन्म प्राणी संग्रहालयातच झालेला आहे. त्यामुळे त्याला मोकळ्या जागेत फिरण्याची, शिकार करण्याची सवय नाही. गेल्या ३६ पेक्षा हा बिबट्या साडेसातवर्षात प्रथमच मुक्तसंचार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com