Pune Leopard News : धक्कादायक ! बिबट्या आता थेट घराच्या उंबऱ्यावर

बिबट्या आला रे आला अशी म्हणण्याची वेळ आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील गावठाणातील नागरिकांना येऊन ठेपली आहे,गेल्या दोन दिवसात बिबट्या नागपूर गावातील चार घरात
Pune Leopard News : धक्कादायक ! बिबट्या आता थेट
Pune Leopard News : धक्कादायक ! बिबट्या आता थेटsakal

निरगुडसर : बिबट्या आला रे आला अशी म्हणण्याची वेळ आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील गावठाणातील नागरिकांना येऊन ठेपली आहे,गेल्या दोन दिवसात बिबट्या नागपूर गावातील चार घरात पोचला,त्यामध्ये दोन ठिकाणी घराच्या उंबऱ्यावरच ठाण मांडले परंतु नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला परंतु दोन दिवसात चार ठिकाणी बिबट्या थेट दारापर्यंत पोचल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे तरी वन विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागापूर गावचे उपसरपंच सुनील शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

बिबट्या आता उसात न दिसता थेट घरच्या उंबऱ्यावर येऊन पोहोचला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे गेल्या दोन दिवसात नागापूर गावात बिबट्याच्या चकरा वाढल्या असून बिबट्या थेट घराच्या उंबऱ्यावर येऊन पोहोचला आहे.रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास शेतकरी रमेश पोहकर हे आपला कृषी पंप सुरू करण्यासाठी नदीवर जात असताना बिबट्या त्यांच्या दुचाकीला आडवा गेला हा प्रकार हॉटेल गौरवच्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला आहे .

Pune Leopard News : धक्कादायक ! बिबट्या आता थेट
Pune Crime News : चाकण,महाळुंगे परिसरातली गुन्हेगारी धोकादायक ; गुन्हेगारीला चाप लावण्याची गरज

त्यानंतर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे राहणाऱ्या कल्पना वाघमारे यांच्या थेट बिबट्या घराच्या उंबऱ्यावरच पोहोचला घरामध्ये एकटी तेरा वर्षाची मुलगी होती तिने घाबरल्या अवस्थेत आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्याने तिथून धूम ठोकली त्याच दिवशी सायंकाळी पावणे सात वाजता मनीषा सुनील शिंदे ह्या घराच्या जवळ बसल्या होत्या,

त्यावेळी अचानक बिबट्या घरामागुन येऊन त्यांच्या समोरील खाटेवर जाऊन बसला त्यानंतर नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने तिथून धूम ठोकली त्याच रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास आनंदा बाळासाहेब लोखंडे यांच्या घरासमोरील कुत्रा बिबट्याने ओढून नेला यावेळी नागरिकांनी फटाके फोडले दगडीही भिरकावले तरीदेखील बिबट्याने त्याच्या तोंडातील भक्ष सोडले नाही ते चार प्रकार गेल्या दोन दिवसात कोणत्या शेतात मळ्यात घडले नाही तर गावात घडल्यामुळे भीतीची वातावरण पसरले आहे.

त्याचप्रमाणे निकम मळ्याजवळ असणारे धनेश निघोट यांच्या शेतात दोन बिबटे दिवसा ढवळ्या गुरगुरत होते त्यामुळे नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वन विभागाने तातडीने यावर मार्ग काढावा बिबट्याला पकडण्याची पिंजरा लावण्याची मागणी नागापूर ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com