Pune Leopard Accident : पुणे - नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी

जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्यावर सुमारे दोन तास पडून राहिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प
leopard injured in vehicle accident pune nashik highway forest department
leopard injured in vehicle accident pune nashik highway forest departmentLeopards

नारायणगाव : पुणे - नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावचे हद्दीत वर्पे मळा येथील हॉटेल आपुलकी जवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्यावर सुमारे दोन तास पडून राहिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमी अवस्थेत बिबट्या नागरिकांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.

घटनास्थळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिक अंमलदार मंगेश लोखंडे, संतोष कोकणे, वारूळवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, बॉबी ढवळे, रेस्क्यू टीम सदस्य मिलिंद टेमकर, किरण वाजगे घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मंचर वनविभागाचे स्मिता राजहंस, नारायणगाव वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनाधिकारी नितीन विधाटे, माणिक डोह बिबट निवारा केंद्रातील महेंद्र ढोरे घटनास्थळी दाखल झाले.महेंद्र ढोरे यांनी बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.

त्या नंतर रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जखमी बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घालून माणिक डोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथील पुणे नाशिक महामार्गावर कळंब ते 14 नंबर दरम्यान मागील दीड वर्षात रात्रीच्या वेळी वाहनाची धडक बसून सुमारे 10 बिबटे,दोन कोल्हे, एक तरस आदि वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com