

Leopard Sighting Reported Near Bremen Chowk, Aundh
Sakal
शिवाजीनगर : रविवारी पहाटे औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोध मोहीम राबवली. बिबट्या पहाटे चार’च्या सुमारास दिसल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कुठेही बिबट्या दिसून आला नाही. परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.