- संतोष काळे
राहू: नांदूर (ता.दौंड) परिसरात गेले अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावरामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याला बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा. अशी मागणी नांदूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश बोराटे, माजी सरपंच युवराज बोराटे, माजी उपसरपंच मयूर घुले, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक विशाल थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.