Pune News: 'राजुरी येथील बिबट्या अखेर जेरबंद'; वनविभागाचे अथक प्रयत्न, पिजऱ्यात अडकला अन्..
Rajuri leopard: वनअधिकारी आणि कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून अखंडपणे क्षेत्राची पाहणी करत होते. पावलांचे ठसे, हालचालींची दिशा आणि स्थानिकांकडून मिळणारी माहिती याच्या आधारे त्यांनी या मोहिमेला गती दिली. पिजऱ्यात ठेवलेल्या खाद्यपदार्थाच्या वासाने बिबट्या आत शिरला आणि क्षणार्धात दरवाजा बंद झाला.
आळेफाटा : राजुरी येथिल आडेवहाळ मळा शिवारात वनविभागाने लावलेल्या पिजऱ्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास अंदाजे चार ते पाच वर्षे वयाचा नर जातीचा बिबटया जेरबंद झाला.