आसखेड खुर्दमध्ये बिबट्याचा वावर

नागरिकांत भीती; पिंजरा लावण्याची मागणी

आंबेठाण - आसखेड खुर्द (ता. खेड) येथे मागील दोन दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. काही दुर्घटना घडू नये यासाठी या भागात पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे.

आसखेड खुर्द हा भाग कृषीप्रधान भाग आहे. त्यामुळे जवळपास सगळीच माणसे शेतात कामावर असतात. परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याने घबराट पसरली आहे. आसखेड खुर्द गावापासून शेलू गावाकडे जाणाऱ्या मधल्या रस्स्त्याच्या परिसरात असणाऱ्या ओढ्यालगत सर्वप्रथम हा बिबट्या दिसल्याचे काळूराम गुंजाळ यांनी सांगितले. त्यानंतर अनेकांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले.

आजवर भामा नदीच्या पलीकडच्या भागात बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते परंतु आता नदीच्या अलीकडे एमआयडीसीच्या दारात बिबट्याचा प्रवेश झाल्याने स्थानिक नागरिकांसह कामगार वर्गात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

नागरिकांत भीती निर्माण झाल्याने तात्काळ वन विभागाला कळविले असून लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्राची लिंभोरेपाटील आणि ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com