
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवनी समाधिदिनानिमित्त आळंदी येथे दरवर्षी भरविण्यात येत असलेल्या कार्तिकी यात्रेत यंदाही पारंपरिक प्रथा-परंपरा खंडित होऊ नयेत. किमान संख्येने विविध उपक्रम साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी आळंदी देवस्थानच्यावतीने सोमवारी (ता.30) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली.
पुणे - संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवनी समाधिदिनानिमित्त आळंदी येथे दरवर्षी भरविण्यात येत असलेल्या कार्तिकी यात्रेत यंदाही पारंपरिक प्रथा-परंपरा खंडित होऊ नयेत. किमान संख्येने विविध उपक्रम साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी आळंदी देवस्थानच्या वतीने सोमवारी (ता.30) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली. याबाबत सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी ग्वाहीही देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या यात्रेतील विविध उपक्रम साजरे करण्यासाठी उपस्थितीसाठी किमान संख्येची मर्यादा दर्शविणारा प्रस्ताव सादर करा. हा प्रस्ताव पुढील परवानगीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल आणि सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी दिली जाईल,असे आश्वासन जिल्हाधिकारी देशमुख यांनी यावेळी विश्वस्तांना दिली.
पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आळंदीतील कार्तिकी यात्रेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज विश्वस्त आणि प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ऍड. विश्वास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी...
येत्या आठ ते 14 डिसेंबर या कालावधीत ही कार्तिकी यात्रा आहे. ही निवासी यात्रा आहे. त्यामुळे परंपरेनुसार टाळकरी, फडकरी उपस्थित राहत असतात. या आठ दिवसांच्या कालावधीत कीर्तन, जागर, नगरप्रदक्षिणा आणि माऊलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा आदी पारंपरिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. ही खूप जुनी प्रथा-परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा खंडित होऊ नये, हीच देवस्थानची मागणी असल्याचे अभय टिळक यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil