पुण्यातील अभ्यासिका चालक म्हणतोय,''हे विठ्ठला आता तूच मला वाचव!''

महेश जगताप 
बुधवार, 1 जुलै 2020

सुयोग हा मूळचा सातारा मधील. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच त्याच्या डोक्यामध्ये अभ्यासिकेची कल्पना आली काहीतरी यातून चार पैसे उभारतील आणि आपला उदरनिर्वाह चालेल अशा विचारातून त्यांनी साधारण सहा महिन्यापूर्वी पुणे शहरात कर्ज काढून दोन अभ्यासिका चालवायला घेतल्या होत्या. यातून थोडीफार मिळगत होती पण, अचानक कोरोना आला आणि हा व्यवसाय बंद पडला

स्वारगेट : तब्बल पाच लाख रुपये सुयोग जाधव या अभ्यासिका चालकाला तीन महिन्याचे भाडे आले आहे. तीन महिन्यात एकही रुपया अभ्यासिकेमधून उभारता आला नाही. जे अभ्यासिका उभारण्यासाठी साधारण दहा लाख खर्च आला होता . तो कर्ज काढून केला होता. साधारण सहा महिने झाले होते. अभ्यासिका चालू करून आणि पुढे हे भाडे पाच लाख रुपये ! आत्ता पुढे मी काय करणार ? हे विठ्ठला आता तूच मला वाचव अशी व्यथा सुयोग याने सकाळशी बोलताना  मांडली आहे .

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुयोग हा मूळचा सातारा मधील. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच त्याच्या डोक्यामध्ये अभ्यासिकेची कल्पना आली काहीतरी यातून चार पैसे उभारतील आणि आपला उदरनिर्वाह चालेल अशा विचारातून त्यांनी साधारण सहा महिन्यापूर्वी पुणे शहरात कर्ज काढून दोन अभ्यासिका चालवायला घेतल्या होत्या. यातून थोडीफार मिळगत होती पण, अचानक कोरोना आला आणि हा व्यवसाय बंद पडला. या अभ्यासिकांना जवळ जवळ तीन महिन्याचे भाडे साधारण पाच लाख रुपये आले आहेत. हा व्यवसाय उभारताना कर्ज काढून उभा केल्यामुळे सुयोग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यातून तीन महिन्याचे भाडे माफ करता येतील का ? यासाठी मी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे, असे त्याने सांगितले. 

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

''आज आषाढी एकादशी ह्या दिवशी एक उत्सवाच वातावरण या महाराष्ट्रमध्ये असते. विशेषतः पुण्यामध्ये. अनेक दिंड्या पुण्यामधून जातात. सगळं वातावरण गजबजून गेल्या सारखं असते. पुणेवासियांबरोबरच बाहेरून आलेल्या विद्यार्थीही पालखीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. यावर्षी मात्र, कोरोनाने सारं धुळीस मिळवलं आहे.
कोणताही अभ्यासिकेचा  मालक मला भाडे सोडणार नाही त्यामुळे आषाढी एकादशीचे औचित्य साधून आता विठ्ठलालाच मी प्रार्थना करणार आहे, तूच यातून मार्ग काढ'' अशी अशा भावना सुयोग  याने व्यक्त केली  आहे .

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

यावरून भाडेकरू आणि मालक पुन्हा वाद उफाळून येण्याची चिन्हें आहेत. महाराष्ट्र सरकारने घरमालकांनी भाडेकरूयांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी अशी विनंती केली होती. मालकांनी मात्र, या विनंतीला ठेंगा दाखवला आहे हे दिसून येते. प्रशासनाने यामध्ये ठोस भूमिका बजावली अशी विनंती अभ्यासाची चालकांनी केली आहे. 
 

रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार झाले अन् उपचार सुरू करण्यापूर्वीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: library owner is worried due to not paying pending rent in pune