हवेली तालुक्‍यात फटाके विक्रीचे परवाने मिळणार, पण...

Firecrackers
Firecrackers

पुणे : दीपावली उत्सवानिमित्त शोभेची दारु आणि फटाके विक्रीचे परवाने हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. फटाके विक्रीची मुदत येत्या 22 नोव्हेंबर अखेरपर्यंत राहणार आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवानाधारकांनी शिल्लक साठा स्वत:जवळ न ठेवता कायमस्वरुपी परवानाधारकाजवळ ठेवावा, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांनी केले आहे. 

हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात 12 नोव्हेंबरपूर्वी साध्या कागदावर 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प तिकीट लावून अर्ज करावा. शोभेची दारु आणि फटाके विक्रीचा व्यवसाय करण्याच्या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा आवश्‍यक आहे. जागा दुसऱ्याच्या मालकीची असल्यास त्याबाबत शंभर रूपयांचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र, पोलिस ठाण्याचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, गतवर्षीच्या परवान्याची झेरॉक्‍स प्रत, तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी सहाशे रुपये भारतीय स्टेट बॅंक शाखेत चलनाद्वारे भरून चलन अर्जासोबत जोडावे. कोरोनाच्या नियमावलीनुसार मास्क, सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. 

शोभेची दारु आणि फटाके विक्रीची मुदत 22 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत अंमलात राहील. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू नये. तो माल कायमस्वरुपाचा परवाना असलेल्या परवानाधारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे, असेही हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांनी कळविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com