Pune ZP: स्थायी समितीवर आमले, जगदाळे बिनविरोध; अंकिता पाटील अर्थ समितीवर

Pune_ZP_2020
Pune_ZP_2020

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर (स्टॅंडिंग कमिटी) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे (ता. दौंड) आणि जुन्नरचे अंकुश आमले यांनी गुरुवारी (ता.५) बाजी मारली. या दोघांची बिनविरोध निवड झाली. या समितीसाठी दावेदार समजले जाणारे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आणि सर्वात तरुण सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची अर्थ समितीवर निवड झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या गुरुवारी (ता.५) झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषय समित्यांच्या २७ पैकी २५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे यापैकी सात सदस्यांचा अपवाद वगळता उर्वरित १८ सदस्यांना वर्षभरानंतर विषय समित्यांवर सदस्यपदी संधी मिळाली आहे. कृषी व पशुसंवर्धन समितीचे प्रत्येकी एक सदस्यपद पुन्हा रिक्त राहिले आहे. पीठासन अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. 

विषय समित्यांच्या विविध रिक्त पदासाठी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत वैध अर्जाची यादी जाहीर केल्यानंतर अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली. या मुदतीत काही सदस्यांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध पार पडली. शिक्षण समितीच्या एक जागेसाठी शोभा कदम यांचा तर जलव्यवस्थापन समितीच्या एका जागेसाठी  राणी शेळके  यांचा प्रत्येकी एकच अर्ज आला होता. त्यामुळे या दोन्ही जागा माघार घेण्यापूर्वीच बिनविरोध झाल्या. 

विषय समितीनिहाय नवनिर्वाचित सदस्यांची नावे : 

स्थायी समिती : वीरधवल जगदाळे (दौंड), अंकुश आमले (जुन्नर).

बांधकाम समिती : सुजाता पवार (शिरूर), भरत खैरे (बारामती), भगवान पोखरकर (खेड).

आरोग्य समिती : विवेक वळसे-पाटील (आंबेगाव), पांडुरंग ओझरकर (मुळशी), जयश्री पोकळे (हवेली).

समाजकल्याण समिती : कीर्ती कांचन (हवेली).

कृषी समिती : प्रवीण माने (इंदापूर), संजय गवारी (आंबेगाव) आणि नीता बारवकर (बारामती).

पशुसंवर्धन समिती : विशाल तांबे (जुन्नर), आशा शितोळे (दौंड), मोनिका हरगुडे (शिरुर).

अर्थ समिती : विश्वास देवकाते (बारामती), सुरेखा चौरे (हवेली), अंकिता पाटील (इंदापूर), श्रीधर किंद्रे (भोर), नलिनी लोळे (पुरंदर), दिनकर सरपाले(वेल्हे), स्वाती शेंडे (इंदापूर), निकिता घोटकुले (मावळ).

शिक्षण समिती : शोभा कदम (मावळ)

जलव्यवस्थापन समिती : राणी शेळके (दौंड).

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com