पुण्यातील या १८ गावांमध्ये लॉकडाउन जाहीर

राजकुमार थोरात
Thursday, 27 August 2020

गणेशोत्सवामुळे बाजारापेठामध्ये गर्दी वाढली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानाची घडी बसत असताना लॉकडाउनमुळे बसू लागलेली घडी विस्कटणार आहे. तसेच, अनेकांनी गणेशोत्सवासाठी आणले साहित्य शिल्लक राहणार असून, नुकसान वाढणार आहे.

वालचंदनगर (पुणे) : ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील १८ गावांमध्ये प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश

इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे.  पश्‍चिम भागातील कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  १८ गावांमध्ये प्रशासनाने कनटेनमेंट व बफर झोन जाहीर केला असून, या गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये लॉकडाउन जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. 

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

गणेशोत्सवामुळे बाजारापेठामध्ये गर्दी वाढली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानाची घडी बसत असताना लॉकडाउनमुळे बसू लागलेली घडी विस्कटणार आहे. तसेच, अनेकांनी गणेशोत्सवासाठी आणले साहित्य शिल्लक राहणार असून, नुकसान वाढणार आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये रस्त्यावर  भाजीपाला विकणाऱ्यांनाही बंदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यांसदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रांतधिकारी व तहसीलदार यांचा पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.

व्यवहार बंद असलेली गावे : रणगाव, भवानीनगर, सणसर, अंथुर्णे, हिंगणेवाडी, उध्दट, वालचंदनगर, कळंब, न्हावी, निरवांगी, शेळगाव, बोरी, कुरवली, जाचकवस्ती, बेलवाडी, जंक्शन, लासुर्णे, निमसाखर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown announced in 18 villages of Indapur taluka