लॉकडाऊनमुळे कलाकारांनी उपासमारीत उपोषणाचा मार्ग अवलंबला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

गेली सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. पण इतर व्यवहार सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होत नसल्याने कलाकारांचे आर्थिक उतपन्नाचे स्रोत बंद आहेत. त्यामुळे सरकार दरबारी कलाकारांचा आवाज पोहचावा, या साठी अभिनेता कुमार पाटोळे यांनी 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाट्यगृहे सुरू करावीत, यासाठी कलाकरांनी आंदोलने देखील केली आहेत.

पुणे - लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक‌ कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची‌ वेळ आली असताना, पुन्हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी उपासमारीत उपोषणचा मार्ग या कलावंतांना अवलंबावा लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेली सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. पण इतर व्यवहार सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होत नसल्याने कलाकारांचे आर्थिक उतपन्नाचे स्रोत बंद आहेत. त्यामुळे सरकार दरबारी कलाकारांचा आवाज पोहचावा, या साठी अभिनेता कुमार पाटोळे यांनी 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाट्यगृहे सुरू करावीत, यासाठी कलाकरांनी आंदोलने देखील केली आहेत.
महा कला मंडल या राज्यव्यापी शिखर संघटनेच्या वतीने  मंडलाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया हेही शपाटोळे यांचे सोबत पहिल्या दिवशी चक्री उपोषण करणार आहेत.

बारामतीत कोरोनासाठी ॲक्टिव्ह सर्व्हे ; तीन गावांच्या सीमा करण्यात येणार सील

नाटक, चित्रपट, शाहिरी, लोककला, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकारांना कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. पाटोळे यांनी सांगितले, की या चक्री उपोषणात महाकला मंडलाचे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

कोरोनानं काय वेळ आणली; बेरोजगार झालेला तरुण बनला चोरटा!

राजेभोसले याबाबत म्हणाले, "सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केल्याशिवाय कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नाही. हे कार्यक्रम सुरू करण्यासाठी सरकार जे काही नियम बनवेल, त्याचे तंतोतंत‌ पालन करण्याची हमी प्रत्येक कलाकार आणि त्यांच्या‌ संस्था देत आहेत. त्यामुळे सरकारने हे‌‌‌ कार्यक्रम सुरू करण्याबाबत‌ सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा‌ केवळ पुणेच नाहीत, राज्यभरातील कलाकारांना उपासमार सहन करावी लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहेत मागण्या
कलाकारांची कर्मभूमी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर येथे 16 तारखेला कलाकारांचे उपोषण होणार आहे. कलाकारांसाठी महामंडळ स्थापन करावे, आरोग्य विम्याचा प्रश्न सोडवावा, प्रवास खर्चात सूट द्यावी, घरकुल योजना राबवावी, कलाकारांची शासन दरबारी नोंदणी करावी, कलाकारांना नोकरी, वृद्ध कलाकारांना निवारा, पेन्शन द्यावी. त्या सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, अशी महा कला मंडलाच्या मागणी आहे.

कलाकारांचे‌ प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि कलाकारांचे शिष्टमंडळ यांची एकत्रित‌ बैठक होणे गरजेचे आहे. मात्र प्रयत्न करून सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच कलाकारांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे.
- मेघराज राजेभोसले

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown artists went on a hunger strike