लॉकडाउनमुळे लोकअदालतीतील तडजोडीचा न्याय थांबला

Court
Court

पुणे - कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेक जखमी झाले. त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्या दाव्यात विमा कंपनीने आईस पाच तर मुलाला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य करून तडजोड झाली. मात्र कोरोनामुळे लोकअदालत रद्द झाल्याने तडजोड झालेले हे प्रकरण अडकून पडले असून तक्रारदारांना पैसे मिळण्यासही उशीर होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अलका आणि राजेश कुबेर यांचा गेल्या वर्षी अपघात झाला होता. त्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबत विमा कंपनी आणि अर्जदार यांच्यात सहा लाख रुपयांची तडजोड झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि जुलैमधील लोकअदालत रद्द करण्यात आली आहे. तर सप्टेंबरमध्ये देखील ती होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या तीनही लोकअदालत रद्द झाल्याने त्यामध्ये तडजोड  होणारी अनेक प्रकरणे सध्या पुढे ढकलली गेली आहेत. तर तडजोडीनंतर तक्रारदारांना हाती येणारे पैसे मिळण्यास उशीर होत आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या चारही  लोकअदालतीमध्ये एक लाख 16 हजार 784 दावे निकाली काढण्यात यश आले होते. यावर्षी मात्र केवळ फेब्रुवारी महिन्यात लोक अदालत झाली असून त्यात सुमारे 20 हजार प्रकरणात तडजोड झाली. आता थेट डिसेंबरमध्ये होणाऱ्या लोकअदालतिकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

लोकअदालत न झाल्याचा अनेक दाव्यांवर परिणाम झाला आहे. तर तडजोड झाल्यानंतर तक्रारदारांना मिळणारे पैसे उशिराने मिळणार आहेत. प्रतिवादी तडजोड झालेल्या रकमेवर ना व्याज देईल ना रक्कम वाढवून देणार आहे. काही प्रकरणे अशी आहेत की त्यांच्यात निकाल लागला आहे. पण विमा कंपनीचे कार्यालय बंद असल्याने पक्षकारांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
- जी. पी. शिंदे, वरिष्ठ वकील

तात्काळ स्वरूपाची प्रकरणे असतील तर ते मिटवण्यासाठी स्थानिक पातळीवर लोकअदालत आयोजित करता येऊ शकते. मात्र शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
- सी. पी. भागवत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

गेल्या वर्षी झालेल्या लोकअदालत -
लोकअदालत - निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले दावे - निकाली दावे 

१७ मार्च - १,४२,७३८ - ४४,७०१
१३ जुलै - ९३,६९० - २८,६६६
१४ सप्टेंबर - ८७,९५८ - १६,१८३
१४ डिसेंबर - ८९,६३५ - २६,७६०

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com